आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • More Than 50 Potholes In A Distance Of One Hundred Meters On The Rajkamal Railway Bridge! ; The Administration Is Only Satisfied With The Repairs | Marathi News

धोकादायक:राजकमल रेल्वे पुलावर शंभर मीटर अंतरात 50 पेक्षा जास्त खड्डे! ; प्रशासन केवळ डागडुजीवर समाधानी

अमरावती / जयश्री देशमुख / स्वप्निल सवाळे ​​​​​​​एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य मार्गामध्ये समावेश होणाऱ्या रेल्वे स्टेशन ते राजकमल, जयस्तंभ रेल्वे पुलावरचे खड्डे धोकादायक ठरत आहेत. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलावरील सुमारे १०० मीटरच्या या रस्त्यावर ५० हून अधिक लहान मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यापैकी काही खड्डे तर २ फूट, ५ फूट व्यासाचे असून ६ ते ७ इंच खोल आहेत. जयस्तंभ चौक व हमालपुऱ्याच्या दिशेने शिक्षक सहकारी बँकेजवळ फुटपाथलगत असलेले खड्डे वाहनचालकांसाठी अतिधोकादायक ठरत आहेत. मात्र, संबंधित यंत्रणेची याकडे सपशेल डोळेझाक होत असल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.

रेल्वे पुलावरील सुमारे १०० मीटर अंतराच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पडलेले खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यासाठी या डांबरी मार्गाच्या काही खड्ड्यात सिमेंट काँक्रीट भरण्यात आले होते, तर काहींमध्ये खडी टाकली होती.

शाळकरी मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात खडीवरून घसरलो अन् जखमी झालो! रेल्वे पुलावरून जात होतो. शाळकरी मुलीने खडीपासून बचावण्यासाठी सायकलचे ब्रेक मारल्याने आम्ही शाळकरी मुलीला वाचण्याच्या प्रयत्नात दुचाकीचे इमर्जन्सी ब्रेक लावले. त्यामुळे आमची दुचाकी घसरली. कारण त्या ठिकाणी खडी पसरली आहे. आमच्या मागून आलेले एक वाहनसुद्धा याच प्रकारे इमर्जन्सी ब्रेकमुळे त्याच वेळी त्याच ठिकाणी अनियंत्रित झाले. या अपघातात माझ्यासह माझे मित्र जखमी झाले होते, असे श्रीकांत आसटकर यांनी सांगितले.

वाहनांचे नुकसान आणि पाठीचे दुखणे
खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अनेकदा दुचाकी घसरत आहे, तर अनेक वाहनांना जबर झटका बसत असल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. अशा खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागणाऱ्या नियमित वाहनचालकांना पाठीच्या व कंबरेच्या दुखण्यानेही विळखा घातला आहे. एकीकडे वाहनाची, तर दुसरीकडे आरोग्याची चिंता भेडसावणाऱ्या वाहनचालकांना या खड्ड्यांमुळे आर्थिक नुकसानाचाही सामना करावा लागत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

वाहनावरील नियंत्रण सुटते
रेल्वेपुल मार्गावरील खड्डे जीवघेणे ठरत आहे. हा शहरातील मुख्य वर्दळीचा मार्ग असल्यामुळे वाहनांची नेहमीच गर्दी राहते. यातच या ठिकाणी खड्डे व खडी पसरली असल्यामुळे ते वाचवण्याच्या नादात वाहनावरील नियंत्रण सुटते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
-दिनेश चव्हाण, वाहनचालक

बातम्या आणखी आहेत...