आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील वडरपुरा भागात राहणाऱ्या एका २२ वर्षीय नवविवाहितेने बुधवारी (दि. ३) गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात मृत विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सासू, नणंद आणि नदंईविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी गुरुवारी (दि. ४) गुन्हा दाखल केला आहे. माधुरी अजय देवकर (२२, रा. वडरपुरा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. माधुरीने बुधवारी दुपारी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. माधुरीचे २७ मे २०२२ ला लग्न झाले होते. माधुरीने गळफास घेतल्याची माहिती मिळताच माधुरीची आई व अन्य नातेवाईक यवतमाळहून अमरावतीत आले. दरम्यान, गुरूवारी माधुरीच्या आईने फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.
मृत्यूपूर्वी माधुरीने फोन कॉल करून तिची सासू, नणंद व नंदई आपल्याला लहान सहान बाबींवरुन खुप त्रास देतात, ते काही ना काही कारण काढून छळ करतात, असे सांगत होती. मात्र, आपण तिची समजूत काढून शांत केले. त्यामुळे या तिघांनीच मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार माधुरीच्या आईने केली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी मृताचा नंदई संतोष पवार (रा. वडरपुरा) व दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.