आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळाचा घात:तारेमध्ये विद्युत प्रवाह संचारल्याने तीन वर्षाच्या मुलीसह आईचा मृत्यू; आकस्मिक मृत्यूची नोंद

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खोलापूर गावातील एक ३५ वर्षीय महिला कपडे वाळत घालत असताना तारामध्ये विद्युत प्रवाह संचारल्याने या महिलेसह तिच्या तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. ४) घडली. या प्रकरणी खोलापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

नर्गिस अंजुम उमेर अहमद (३५) आणि आरेशा खानम उमेर अहमद (३, दोन्ही रा. खोलापूर) असे मृत आई व मुलीचे नाव आहे. नर्गीस अंजुम या सोमवारी दुपारी वॉशिंग मशिनमध्ये कपडे धूत होत्या. कपडे धुतल्यानंतर ते कपडे घरातीलच तारेवर वाळत घालत असताना त्यांना अचानक जोरदार विद्युत शॉक लागला. यावेळी त्यांची मुलगी आरेशा बाजूलाच खेळत होती. आरेखाने तिच्या आईला स्पर्श करताच तिला सुध्दा विजेचा धक्का बसला. यामध्ये दोघींचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी तत्काळ खोलापूर पोलिसांना माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...