आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध रेती उत्खननाविरोधात शोले स्टाईल आंदोलन:मागण्यांसाठी टाॅवरवर चढला तरुण, लेखी आश्वासनानंतर 2 तासांनी उतरला खाली

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

करतखेड येथील पूर्णा नदीपात्राताच्या हेलडोह घाटावर अवैधरित्या रेतीचे उत्खनन केल्याप्रकरणी प्रशासनाने संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी लोतवाडा येथील भीमराव कुऱ्हाडे टॉवरवर चढले.

गळ्यात दोर बांधून वर चढल्याने यंत्रणेची धावपळ झाली. मंगळवार, 6 डिसेंबरला दुपारनंतर कुऱ्हाडे हे दर्यापुरातील शिवररोडस्थीत टॉवरवर चढले. त्यांची ही वीरुगीरी तब्बल 2 तास सुरू होती. या आंदोलनाची माहिती शहरभर पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

करतखेडा (लोहितखेडा) गावालगत पूर्णा नदीपात्रातून लिलावधारक अमीत काळकर रा बुलढाणा, युवराज खेडकर रा. करतखेड यांनी करारनामा व अटी, शर्तीचे उल्लंघन करीत 9 जूननंतरही अवैधरीत्या रेतीचे उत्खनन केले. एवढेच नव्हे तर पुरावा नष्ट करण्याचे प्रयत्न केले, असा कुऱ्हाडे यांचा आरोप आहे. याबाबतची व्हिडीओ क्लिप त्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींकडे पुरविली आहे.

दरम्यान त्या आधारे चौकशी करुन सात दिवसात दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी होती. याच काळात प्रकरणाची दखल घेत तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी मागील महिन्यात 8 लाख 75 हजाराचा दंड आकारण्याचे आदेशही दिले होते. मात्र दोषीविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवून फौजदारी कारवाई केली नाही.

त्यामुळे संतप्त झालेले तक्रारकर्ते भीमराव कुऱ्हाडे यांनी मंगळवारी दुपारी शिवररोड लगतच्या टॉवरवर चढून स्वताच्या गळ्याला दोरी बाधून घेतली होती. दरम्यान घटनेचे गांभीर्यं बघता तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाली चौकशी करुन पुढील कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले. या लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्ते भीमराव कुऱ्हाडे यांनी अखेर दोन तासानंतर माघार घेतली. यावेळी प्रभारी ठाणेदार विनायक लंबे व पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

बातम्या आणखी आहेत...