आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय मेजर ध्यानचंद चषक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम एकतर्फी अंतिम सामन्यात एमपी अकादमी ग्वाल्हेरने दमदार खेळासह बीएसपी दिल्लीचा ५-० गोलने दणदणीत पराभव करून अजिंक्यपदाचा मान पटकावला.
जेसीआय अमरावती गोल्डन व अमरावती जिल्हा महिला वुमेन्स हॉकी अकादमी, क्रीडा उपसंचालक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील तीन क्रीडांगणावर ही स्पर्धा झाली. त्यात एचव्हीपीएम, पं.जवाहरलाल नेहरू स्टेडियम आणि डिप्टी ग्राऊंडचा समावेश आहे. अंतिम सामना पं.जवाहरलाल नेहरू जिल्हा स्टेडियमवर रंगला. या सामन्यात बीएसपी दिल्लीचा प्रतिकार ग्वाल्हेरने सहज मोडून काढला. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यातही यजमान अमरावतीच्या पदरी निराशा आली. अमरावतीला पुणे संघाकडून ०-२ गोलने मात सहन करावी लागली.
पुणे संघाची मोहिनी स्पर्धेतील उत्कृष्ट गोलरक्षक ठरली तर एमपी ग्वाल्हेरच्या पाशूने स्पर्धेत ७ गोल करून उत्कृष्ट स्कोरर असा मान पटकावला. एमपी ग्वाल्हेरची निलिमा ही स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.
अंतिम सामन्यानंतर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी क्रीडा उपसंचालक विजय संतान, माजी हॉकीपटू, जेसीआय, जिल्हा महिला वुमेन्स हॉकी अकादमीच्या पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.