आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणीकडे सर्वांचे लक्ष:खासदार नवनीत राणा यांनी पोलिस आयुक्त आरती सिंह यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवर आज होणार सुनावणी

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार नवनीत राणा यांनी पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीची आज संसदीय विशेषाधिकार समिती समोर सुनावणी पार पडणार आहे. आज होणाऱ्या या सुनावणीसाठी राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग आणि तत्कालीन उपायुक्त शशिकांत सातव उपस्थित राहणार आहेत. आज होणाऱ्या सुनावणीसाठी खासदार नवनीत राणा अमरावतीत दाखल झाल्या आहेत.

सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

नवनीत राणा यांनी केलेल्या हक्कभंगाच्या तक्रारीनंतर राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंग आणि अमरावतीचे पोलिस उपायुक्त शशिकांत सातव यांना नोटीस पाठवून 6 एप्रिलला लोकसभा सचिवालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

निलंबनाची कारवाई करायला लावणार- नवनीत राणा

खासदार नवनीत राणा यांनी 14 नोव्हेंबर 2020 दिवाळीच्या दिवशी कारागृहाबाहेर महिलांना घेऊन ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2020 ला राणा दोन शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री यांच्या मातोश्रीवर जाऊन निवेदन देणार होत्या. मात्र, त्याआधी पोलिसांनी संध्याकाळी त्यांना घरूनच ताब्यात घेऊन पोलिस आयुक्त कार्यालयात आणले होते. यावेळी खासदार नवनीत राणा चांगल्याच संतापल्या होत्या आणि त्यांनी तेव्हाच सांगितले होते की, या सगळ्या पोलिस अधिकाऱ्यांना संसदेत बोलावून यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला लावणार. याचीच तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष यांना 12 जानेवारी 2021 ला केली आणि त्या तक्रारींवर इतर चार खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ज्यामध्ये भारती पवार आणि हिना गावित यांचाही समावेश आहे आणि अखेर लोकसभा सचिवालय मधून 24 फेब्रुवारी 2022 ला उपसचिव यांनी 9 मार्च रोजी मुंबई पोलिस आयुक्त, अमरावती पोलिस आयुक्त डॉ आरती सिंग आणि तत्कालीन अमरावती पोलिस उपआयुक्त शशिकांत सातव यांना उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. आता 6 एप्रिल रोजी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे ज्यामध्ये आता पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना देखील हजर राहावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...