आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे (एमपीसीबी) राजापेठेतील काम धेनू प्राकृतिक ऊर्जा केंद्राच्या सहकार्याने ‘सिंगल यूज प्लास्टिक उत्पादनां’चे निर्मूलन व बंदीबाबत विविध विभागांची कार्यशाळा बचत भवनात शुक्रवार १० रोजी घेण्यात आली. त्यात १४२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके, नगरप्रशासन सहायक आयुक्त गीता वंजारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत, उपप्रादेशिक अधिकारी संजय पाटील, क्षेत्र अधिकारी जितेंद्र पुरते, सुरेंद्र कारणकर, प्रियश्री देशमुख, नंदकिशोर पाटील, निसर्ग मित्र नंदकिशोर गांधी, कर्तव्य फाउंडेशनचे आशिष श्रीवास यावेळी उपस्थित होते. कार्यशाळेद्वारे सहभागींना महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणूक) अधिसूचनेबाबत माहिती देण्यात आली. निसर्ग मित्र नंदकिशोर गांधी यांनी एकल वापर प्लास्टिक उत्पादने व वस्तूंच्या बंदीबाबत तांत्रिक माहिती दिली. प्लास्टिकबंदी लागू असलेल्या वस्तू व अपवाद याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींचे अधिकारी व कर्मचारी, महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.