आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:दर्यापुरातील धनराज खत्रीवर ‘एमपीडीए’ ; वर्षभरासाठी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दर्यापूर येथील कुख्यात गुन्हेगार धनराज पुंडलीक खत्री (३२, रा. बनोसा, दर्यापूर) याच्याविरुद्ध ग्रामिण पोलिसांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली आहे. त्याला एक वर्षासाठी येथील जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई मंगळवारी केली. धनराज खत्रीविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करणे, चोरी करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी दुखापत पोहोचवणे, फौजदारी पात्र कट रचणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने वागणे, हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

यासंदर्भात पोलिसांकडून त्याच्यावर यापूर्वी कारवाई सुद्धा केल्या आहेत. मात्र, त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे एसपी अविनाश बारगळ यांनी खत्रीच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करुन मंजूरातीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. तो मंजूर झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...