आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 जण राहिले गैरहजर‎:दाेन केंद्रांवर पार पडली‎ एमपीएससीची परीक्षा‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ‘गट-क’‎ सेवा मुख्य परीक्षा शनिवारी (दि.४) रोजी‎ शहरातील दोन केंद्रांवर घेण्यात आली.‎ जिल्ह्यातील ५१६ उमेदवार ही परीक्षा पात्र ठरले‎ होते. त्यापैकी ५०९ उमेदवारांनी परीक्षा दिली‎ तर सात विद्यार्थी विविध कारणांनी गैरहजर‎ होते. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार‎ घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने मनुष्यबळ‎ तैनात करण्यात आले होते.‎

राज्य शासनाच्या सेवेतील ‘गट क’ ची पदे‎ शासनाच्या मागणीनुसार व पदांच्या‎ उपलब्धतेनुसार या परीक्षेतून भरण्यात येत‎ आहे. शासनाच्या मागणीनुसार, महाराष्ट्र‎ ‘गट-क’ सेवेमध्ये उद्योग निरीक्षक, उद्योग‎ संचालनालय दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन‎ शुल्क, तांत्रिक सहाय्यक, विमा‎ संचालनालय, कर सहाय्यक,‎ लिपिक-टंकलेखक या पदांची संयुक्त पूर्व‎ परीक्षा घेण्यात आली. याची मुख्य परीक्षा‎ शनिवारी सकाळी ११ ते १२ या वेळात‎ शहरातील दोन केंद्रांवर होणार घेण्यात‎ आली. यामध्ये गोल्डन किड्स आणि‎ ज्ञानमाता या केंद्राचा समावेश आहे.‎ जिल्ह्यातील ५१६ उमेदवार परीक्षेस पात्र‎ ठरले होते. मात्र, त्यापैकी ५०९ उमेदवारांनी‎ परीक्षा दिली . तसेच ७ परीक्षार्थींना विविध‎ कारणांनी गैरहजर राहावे लागले. यावेळी‎ कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता‎ जिल्हा प्रशासनाकडून मनुष्यबळ तैनात‎ करण्यात आले होते.‎

बातम्या आणखी आहेत...