आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभरती:शनिवारी 30 केंद्रांवर एमपीएससी पूर्व परीक्षा ; जिल्ह्यातील 8 हजार 672 उमेदवार देणार परीक्षा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येत असलेली महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२२ शनिवारी शहरातील विविध ३० केंद्रांवर होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८ हजार ६७२ विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले आहेत.कोरोना काळानंतर शासनाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आगामी ५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र गट - क सेवा पूर्वपरीक्षा २०२२ घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील ८ हजार ६७२ उमेदवार परीक्षा देणार आहे. त्यासाठी शहरातील ३० विविध केंद्र निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये ज्ञानमाता, होलीक्रॉस, विद्याभारती यासारख्या महाविद्यालय केंद्रांचा समावेश आहे. सकाळी ११ ते १२ या दरम्यान परीक्षा होणार आहे. यामध्ये लिपिक टंकलेखन, कर सहाय्यक आदी पदांचा यामध्ये समावेश आहे. परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने यासाठी ९५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...