आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळ:जिल्ह्यात बरसल्या मृगसरी; वादळामुळे पडली झाडे

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृग नक्षत्र सुरु झाल्याच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी शहरात जोरदार मृगसरी कोसळल्या. दस्तूरनगर, मोतीनगर, सैनिक कॉलनी, मेहरबाबा कॉलनी या भागात पावसाचा झोत बऱ्यापैकी अधिक होता. सोबतीला वादळ-वारा असल्याने सैनिक कॉलनीत एक झाड उन्मळून पडले. त्याचवेळी मोती नगर भागातील नरसम्मा हिरय्या कॉलेज नजिकच्या एका घरात पाणी साचले.

दरम्यान, दर्यापूर तालुक्यात वादळी पाऊस झाला. विजेचे सहा ते खांब कोसळले तर दोन ते तीन ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जिल्ह्याच्या निम्म्या तालुक्यातही दुपारनंतर तुरळक पाऊस झाला. सायंकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास आकाशात अचानक ढग दाटून आले. प्रकाश काहीसा अंधुक झाल्याच्या पाठोपाठ मृग सरींनी हजेरी लावली.

त्यामुळे दस्तुरनगर-बडनेरा बायपासवरील सैनिक कॉलनीत सुमारे ५० वर्षे जुने कडूलिंबाचे झाड उन्मळून पडले. तर मोती नगर भागातील एका घरात पाणी साचल्याने मनपाच्या नियंत्रण कक्षातील शीघ्र कृती दलाला पाचारण करावे लागले. सायंकाळच्या सुमारास आलेला हा पाऊस उर्वरित. पान ४ मृग नक्षत्र सुरु झाल्याच्या तिसऱ्या दिवशी अमरावती शहरात दुपारी जोरदार मृगसरी कोसळल्या. या पावसाने रस्ते न्हाऊन निघाले.

बातम्या आणखी आहेत...