आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ग्राम एकांबा येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले असून, वारंवार मागणी करून देखिल महावितरण विभागाकडून पेयजल योजना कार्यान्वित करण्यासाठी विद्युत रोहित्र न बसवल्यामुळे योजनेचे काम पूर्ण होऊन सुद्धा केवळ वीज जोडणीअभावी गावकऱ्यांना विशेषत: महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याचा निषेध करत गावातील संतप्त महिलांनी २ जानेवारी रोजी एकांबा ग्रामपंचायतीवर रिकामी भांडी घेऊन आंदोलन केले.
एकांबा ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले असून सर्वच घरांमध्ये नळ देखील बसवले आहेत. मात्र कायमस्वरूपी विद्युत रोहित्र नसल्यामुळे मुबलक पाणी असून देखील पेयजल योजना कोरडी पडली आहे. विद्युत रोहित्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत एकांबा येथील सरपंच नारायण चव्हाण यांनी ११ ऑक्टोबर २०१९ रोजी महावितरणला रितसर प्रस्ताव पाठवून सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने १९,९७९ रूपये रकमेचा २९ मे २०२० रोजी भरणा केला आहे.
सलग ३ वर्षांपासून ग्रामपंचायत एकांबाच्यावतीने पेयजल योजनेसाठी रोहित्र बसवण्यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार केला, गतवर्षी १२ डिसेंबर रोजी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांनी मिळालेल्या तक्रारीनुसार कार्यकारी अभियंता यांना एकांबा येथील तक्रारीचे निवारण करण्यासंदर्भात सूचना दिल्यात, मात्र महावितरणकडून अद्याप कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाही. दरम्यान पेयजल योजनेसाठी आवश्यक विद्युत रोहित्र महिनाभरात न बसवल्यास ग्रामस्थ जिल्हास्तरावर आंदोलन करतील. तसेच हे प्रकरण न्यायालयात खेचण्याचा इशाराही एकांबा येथील सरपंच नारायण चव्हाण यांनी महावितरणला दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.