आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोसायटी ऑफ ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग बहा क्लबद्वारे दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीच्या तृतीय व चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी एक इलेक्ट्रिकवर चालणारी बहुपयोगी स्पोर्टस कार बनविली आहे. बहा क्लबच्या सर्व अटी व नियमांचे पालन करून कमी खर्चात मजबूत इलेक्ट्रिक कार बनवण्याचे आव्हान विद्यार्थ्यांनी स्वीकारले व यशही मिळविले. ही स्पोर्ट्स कार डोंगर, लहान ओढे, नाले अशा कोणत्याही खडतर मार्गावरून चालण्यास सक्षम आहे.
इलेक्ट्रीक वाहन बनवणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रथम योग्यता चाचणी व मुलाखत घेतल्यानंतरच त्यांची क्लबसाठी निवड करण्यात आली. आता हे वाहन चंडीगढ येथे होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार असून, वाहनासह विद्यार्थ्यांची टीम रवाना झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करून त्यातून प्रत्येक गटाकडे ठराविक भाग तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. इलेक्ट्रिक वाहन बनवण्यासाठी डिझाइन ,ब्रेक, सस्पेंशन, व्हेइकल डायनॅमिक अशा विविध क्षेत्रात कामगिरी करावी लागली. हे सर्व करत असताना या टीमला प्रथम वेगवेगळ्या ऑनलाइन फेऱ्या मध्ये यश मिळवून पात्रता सिद्ध करावी लागली.
तसेच विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक स्पोर्टस कारचे ‘सॉफ्ट व्हर्जन’ बनवून बहा ने दिलेल्या ट्रॅकवरून गाडी ऑनलाइन पद्धतीने चालवून दाखवावी लागली. पात्र ठरल्यानंतर विद्यार्थ्यांनी दिवस-रात्र एक करून ८ दिवसांत कार तयार केली. ५ किलो व्हॅट, ४८ व्होल्ट बॅटरीवर चालणारी पीएमएसएम मोटार या वाहनाला जोडण्यात आली आली आहे. याची क्षमता ही ७५ एनएम पीक टाॅर्क तर किमान २५ एनएम नाॅमिनल टाॅर्क आहे. या कारचे उद्घाटन प्राचार्य डॉ. आशिष महल्ले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी एस. ए. ई. बहा चे समन्वयक डॉ. राजेश मेटकर तसेच डॉ. शेटे आणि इतर प्राध्यापक उपस्थित होते. मागील वर्षाचे पथक प्रमुख, इतर सदस्यांनी हे वाहन बनवताना परिश्रम घेतले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीच्या एस.ए.ई. बहा टीमने बनविलेली बहुउपयोगी इलेक्ट्रिक कार. टीमचे इतर सदस्य मोहिनी देशमुख, अभिषेक मेश्राम, ज्ञानेश्वर येवले , भगीरथ भट्ट, एकता किशोर महाजन, अनुराग देहलीवाले ,गौरव पतिंगे, रितेश कुशवाह, संजना बोपचे, सुमित पालवे, विशाखा अकोलकर, गौरव मेश्राम, राज यादव, संकेत ओगले,संकेत चोरे, श्रेया बोरकर, आनंद घाडगे, कल्पेश अटळकर, औवासे वाणी हे सर्व विद्यार्थी रविवारी चंडीगढ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.