आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग रचना:मनपा आयुक्त सुटीवर; प्रभाग रचना प्रस्तावासाठी मुदत मागणार?

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य निवडणूक आयोगाने महानगर पालिकेला १२ मे पर्यंत प्रभाग रचनेचा अंतिम प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. मात्र मनपा आयुक्त तीन दिवस सुटीवर असल्याने मनपाद्वारे याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. अशात आयुक्त गुरुवार १२ रोजी सुटीवरून परतल्यानंतर अंतिम प्रस्ताव सादर करण्यास वाढीव मुदत मागणार काय? अशी चर्चा मनपा वर्तुळात सुरू होती.

मनपाने तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तसेच त्यावरील हरकती व सूचना निवडणूक आयोगाकडे सादर केल्या आहेत. अशात १० मे रोजी निवडणूक आयोगाद्वारे जारी करण्यात आलेल्या अधिसुचनेत ११ पर्यंत प्रभाग रचनेचे काम पूर्ण करून १२ रोजी ती सादर करावी, असे म्हटले आहे. कारण १७ रोजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना ही राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. ते बघता अनेक इच्छूक बुधवार ११ रोजी मनपा निवडणूक विभागात येऊन अंतिम प्रभाग रचना आज पाठविणार काय? असे प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना करीत होते. याबाबत मनपा आयुक्त सुटीवरून परतल्यानंतरही स्पष्ट होणार आहे. अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे कधी पाठविणार याबाबत संभ्रम कायम आहे. मनपाची तयारी सुरू : महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचनेबाबत अधिसुचना जारी झाल्यानंतर मनपाचा निवडणूक विभाग कामाला लागला आहे. मतदानासाठी सुमारे ८५० मतदान कक्ष कक्ष राहणार असून ते व्यवस्थित करण्याचीही तयारी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...