आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगिरी:महापालिकेद्वारे 31 मार्चअखेर विक्रमी 80 टक्के मालमत्ता कराची वसुली; जप्तीच्या कारवायांचा परिणाम

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दंडात सवलत, अभय योजना, वॉर्ड निहाय शिबिरांसह जप्ती च्या कारवायांमुळे मनपाद्वारे ३१ मार्चपर्यंत विक्रमी ८० टक्के मालमत्ता कराची वसुली करण्यात आली. मालमत्ता कर हाच मनपाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्यामुळे तो वसूल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले.

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या कालावधीत दंडात अनुक्रमे ७५ टक्के, ५० टक्के व २५ टक्क्यांप्रमाणे माफी देण्यात आली होती. त्यानंतर मालमत्ताधारकांकडून थकीत कर भरण्यासाठी प्रतिसाद मिळाला. परिणामी मोठ्या प्रमाणात कर वसुली झाली. चालू वर्षात आतापर्यंत ४० कोटी रुपयांच्या वर वसुली करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात थकबाकीसह मालमत्ता कर वसुलीवर विशेष भर देण्यात आला. थकबाकी वसुलीसाठी थकित मालमत्ता करावर २ टक्के व्याज माफ करण्यात आले होते. त्याला मुदतवाढ देण्यात आल्याने मार्चमध्ये कर वसुलीचा आलेख उंचावला. आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी ५० कोटी ५६ लाख ८९ हजार ७४४ रुपये मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दीष्ट्य होते. त्यापैकी ४० कोटी ८३ लाख १४२ रु. मालमत्ता कर मनपाकडे जमा झाला आहे. थकित कर वसुलीसाठी मनपाकडून विशेष वसुली अभियान राबविण्यात आले. त्याअंतर्गत शहरातील पाचही झोनमध्ये वसुली शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या विशेष वसुली शिबिरातून एकूण उद्दिष्टाच्या ८० टक्के मालमत्ता कर गोळा करण्यात आला.

झोन क्र. १ मधून ११ कोटी ४४ लाख ४४ हजार ७८८, झोन क्र. २ मधून ११ कोटी ५१ लाख ७४ हजार ९८२, झाेन क्र. ३ मधून ९ कोटी २४ लाख ८४ हजार ८५, झोन क्र. ४ मधून ४ कोटी ९१ लाख ३ हजार ६८४ व झोन क्र. ५ मधून २ कोटी ९४ लाख ७५ हजार २५ रुपये मालमत्ता कर वसूल करण्यात आला. डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी मूल्यनिर्धारकनी कर संकलन अधिकारी महेश देशमुख, झोन क्र.१ चे सहायक आयुक्त योगेश पिठे, झोन क्र. २ चे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, झोन क्र. ३ चे सहायक आयुक्त नंदकिशार तिखिले, झोन क्र. ४ चे सहायक आयुक्त श्रीरंग तायडे, झोन क्र. ५ चे सहायक आयुक्त तौसिफ काझी, सहायक क्षेत्रीय अधिकारी, कर निरीक्षक, मालमत्ता कर वसुली लिपिक यांचे अभिनंदन केले.

शासकीय मालमत्तांकडून यंदा करच आला नाही
शासकीय मालमत्तांना यंदा अनुदान मिळाले नसल्याने त्यांच्याकडून १ कोटी २१ लाख ४३ हजार ४०४ रु. करच आला नाही. पुढील आर्थिक वर्षात हा दंडासह वसूल केला जाईल. त्यामुळे यंदाच्या एकूण मालमत्ता कराच्या उद्दिष्ट्यातून हा कर वजा करण्यात आल आहे. त्यामुळे मालमत्ता कराची शुद्ध मागणी ही ४९ कोटी ३५ लाख ४६ हजार ३४० कोटी असून त्यानुसार वसुलीची टक्केवारी ही ८१.०६ टक्के असल्याची माहिती मनपाच्या कर संकलन विभागाद्वारे देण्यात आली.

दंडाच्या रकमेतून दिली एक कोटी ३८ लाखाची सुट
जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीत मालमत्ता करावर आकारण्यात आलेल्या २ टक्के दंडाच्या रकमेवर सुट देण्यासाठी अभय योजना राबविण्यात आली. त्यानुसार एकूण दंडाच्या रकमेतून मनपाने १ कोटी ६८ लाख ५५ हजार ९७३ रुपयांवर कायमस्वरूपी सुट दिली आहे. त्यामुळे एकूण उद्दीष्ट्यातून ही रक्कम देखील वजा करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी लवकरात लवकर मालमत्ता कर भरावा, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

वसुलीत १३ टक्क्याने वाढ
गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराची वसुली ही ६७% होती. त्यानुसार ३३ कोटी रु. मालमत्ता कर वसूल झाला होता. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ कोटी रुपये अधिक कराची वसुली झाली असल्याची माहिती मनपा प्रशासक डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...