आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी:मनपा कडून उद्यानांसह खेळणी दुरुस्तीस सुरुवात

अमरावती16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरामध्ये १७२ उद्याने असून त्यापैकी ९० उद्याने ही कंत्राटी तत्त्वावर देण्यात आली असली, तरी या उद्यानांची स्थिती फारच वाईट होती. दिव्य मराठीने २७ जुलैच्या अंकात मनपाचे उद्याने, ‘नाकापेक्षा मोती जड’ या मथळ्याखाली उद्यानांच्या एकूणच स्थितीवर प्रकाश टाकला होता. याची दखल घेत मनपा प्रशासनाने कंत्राटदारांना तत्काळ उद्यानांची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार उद्यानांची स्थिती सुधारण्यासह तुटलेली खेळणीही दुरुस्त केली जात आहेत.

त्यामुळे यापुढे बालकांना मनसोक्त खेळता येणार असून, उद्यानांची स्वच्छता व सुशोभीकरणाकडेही लक्ष दिले जाईल. परिणामी नागरिकांनाही फावल्या वेळात उद्यानांमध्ये येऊन आनंद घेता येणार आहे. शहरातील ६० टक्के उद्यानांची स्थिती कमी-जास्त प्रमाणात वाईट होती. खेळणी तुटली होती. फुलझाडे व्यवस्थित नव्हती. सौंदर्यीकरणही करण्यात आले नव्हते. त्यामुळे घरापुढील उद्यानांमध्ये जाण्यास नागरिकांनाही फारसा रस वाटत नव्हता. मात्र, आता दुरुस्ती सुरू झाल्यामुळे उद्याने पुन्हा नागरिकांच्या गर्दीने बहरतील, अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...