आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका:अतिक्रमण विभागासाठी चार ट्रक, टिप्पर महापालिका खरेदी करणार ; सुधारणांचा धडाका

अमरावती18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा प्रशासनाने एव्हाना सुधारणांचा धडाका सुरू केला असून या निमित्ताने रखडलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. याअंतर्गतच ४ ट्रक व एक टिप्पर खरेदीसाठी कंपन्यांकडून कोटेशन मागवले जात आहे. हे चार ट्रक व टिप्पर अतिक्रमण विभागासाठी खरेदी केले जाणार आहेत. या साहित्यांचा अंदाजित खर्च मनपाने १.७ कोटी रुपये गृहित धरला आहे. शहरातील अतिक्रमण निर्मूलन कारवाईदरम्यान जे साहित्य उचलले जाते, ते ठेवण्यासाठी ट्रक व टिप्परची आवश्यकता असते. अतिक्रमण विभागाकडे फारच मर्यादित प्रमाणात साहित्य आहे. याची दखल घेत मनपा आयुक्तांनी ४ ट्रक व एक टिप्पर खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...