आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मनपाचे पाडकाम सुरुच, पुन्हा 3 इमारतींवर चालला जेसीबी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जीर्ण झालेली इमारत कोसळून अमरावतीत अलीकडेच पाच जणांचा बळी गेला. त्यानंतर मनपाने शिकस्त झाल्याची नोटीस बजावलेल्या सर्वच इमारती रडारवर आणल्या असून त्यांचे पाडकाम दररोज क्रमाक्रमाने केले जात आहे. याच मालिकेत शनिवारी महापालिकेच्या यंत्रणेने अंबागेटचा आतील भाग आणि राजापेठ परिसरात पाडकामाची कारवाई केली. या दरम्यान तीन इमारतींचा जीर्ण भाग भुईसपाट करण्यात आला.

आजच्या कारवाईदरम्यान राजापेठ भागातील रहिवासी सुधीर गुप्ता यांच्या मालकीच्या इमारतीचा जीर्ण झालेला वरचा मजला पाडला. ही इमारत राजापेठ भागातील डॉ. जयंत पांढरीकर यांच्या दवाखान्यासमोरची आहे. त्याचवेळी दुसऱ्या कारवाईत अंबागेटच्या आतील विठ्ठलराव घोडेराव यांच्या मालकीची दुमजली इमारत पाडण्यात आली. दरम्यानच्या काळात जवाहर गेट सेंट्रल बँक जवळील सतीश शर्मा, कौशल शर्मा यांच्या मालकीचे शिकस्त घरही पाडण्यात आले. मनपा झोन क्रमांक ५ चे सहायक आयुक्त काझी आणि त्यांच्या कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांच्या देखरेखीत ही कारवाई करण्यात आली. विशेष असे की यावेळी घर मालक स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते. पाडकाम कारवाईसाठी अतिक्रमण निर्मूलन प्रमुख प्रमुख अजय बन्सेले, निरीक्षक श्याम चावरे, योगेश कोल्हे व त्यांचे सहकारी तसेच झोन ५ चे उपअभियंता सचिन मांडवे, सहायक अभियंता प्रवीण भेंडे यांच्यासह अर्षद खान यांनी परिश्रम घेतले.

महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या पाहणी नंतर मनपा प्रशासनाने गेल्या सहा दिवसांपासून शहरात पाडकाम सुरु केले आहे. ज्या इमारतींचा जीवनकाल संपुष्टात आला, किंबहुना ज्या इमारती जर्जर झाल्याने मानवी वस्तीस्थानासाठी योग्य नाहीत, अशा इमारतींच्य मालकांना आधीच नोटीस बजावण्यात आल्या आहेत. परंतु काहींनी खासगी यंत्रणेचा आडोसा घेत ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चे खोटे अहवाल सादर केले तर काहींनी न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करत कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. अशीच एक इमारत कोसळल्याने सहा दिवसांपूर्वी पाच जणांचा मृत्यू ओढवला होता.

बातम्या आणखी आहेत...