आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना:बडनेरा नवी वस्तीतील इमारत सील करण्याची मनपाची नोटीस

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभात चौकातील शिकस्त इमारत कोसळून ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच असल्याने मनपाने शहरातील शिकस्त इमारतींच्या मालकांना नोटीस बजावल्या आहेत. त्यातच बडनेरा नवी वस्ती येथील जयस्तंभ चौकात असलेल्या इमारतीला सील करण्याची नोटीस मनपाद्वारे बजावण्यात आली आहे.

या इमारतीत डाॅ. अशोक गायकवाड यांचे कुटुंबीय वास्तव्यास असून, तेथे दवाखानाही आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून ही इमारत असून, येथील दवाखान्यात ग्रामीण भागातील नागरिक मोठया प्रमाणात उपचार घेण्यासाठी येतात. इमारतीचे छत हे टिनाचे असून सभोवताल भिंती आहेत. परंतु, मनपाच्या दृष्टीने ही इमारत धोकादायक असून ती तत्काळ मनुष्यरहीत करण्यात यावी, यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. जेणेकरून जर इमारतीचा एखादा भाग कोसळला तर त्यात जिवितहानी होणार नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून नोटीस पाठवल्याची माहिती मनपाच्या बडनेरा झोनच उपअभियंता तायडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...