आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान‎:सफाई मित्र सुरक्षा अभियानासाठी‎ मनपा 18 लाख खर्चून 10 टँकर‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत शहरातील‎ स्वच्छता मित्र सुरक्षा अभियान‎ लवकरच सुरू केले जाणार असून‎ यासाठी सुमारे १८ लाख रु. खर्च करून‎ १० टँकर तयार केले जात आहे.‎ मनपाच्या स्वच्छता विभागाद्वारे‎ शहरातील स्वच्छता व्यवस्थित‎ करण्यासाठी हे अभियान राबवले‎ जाणार आहे.‎ या कामात मनपाकडे उपलब्ध‎ असलेल्या १० टँकरची दुरुस्ती करून ते‎ तयार केले जातील. यात तीन क्लाज‎ (घाण) स्वच्छ करणारे, ३ पाण्याचे, २‎ साधे व्हॅक्यूम तर २ जटायू टँकर्स‎ असतील. या टँकर्सची दुरुस्ती तसेच‎ रंगरंगोटी केल्यानंतर केंद्र सरकारने‎ पाठवलेल्या म्हणी त्यावर स्टीकर्सद्वारे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ लावल्या जातील.‎

स्वच्छता मित्र सुरक्षा अभियानांतर्गत‎ शहरातील स्वच्छतेच्या तक्रारी दूर‎ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.‎ यामुळे गटर, नाल्यांच्या स्वच्छतेसाठी‎ मदत मिळणार असून, कामही वेगाने‎ पूर्ण होणार आहे.‎लवकरच राबवणार‎ शॉर्ट निविदा प्रक्रिया‎ टँकर्सच्या दुरुस्तीसह रंगरंगोटीसाठी‎ लवकरच शाॅर्ट निविदा प्रक्रिया राबवली‎ जाणार आहे. त्यानंतरच शहरातील‎ स्वच्छतेच्या कामी हे तयार झालेले‎ टँकर्स वापरले जातील. परिणामी‎ शहराच्या स्वच्छतेत भर पडल्याशिवाय‎ राहणार नाही, अशी माहिती स्वच्छता‎ विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.‎