आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवसारी रिंग रोडमध्ये गेलेल्या जमिनीचे बाजार मूल्यानुसार दर मिळावेत यासाठी न्यायालयात गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना मनपाने तत्काळ भरपाई द्यावी, अन्यथा जप्तीची कारवाई केली जाईल, असा निर्णय दिला. त्यानंतर हा आदेश घेऊन न्यायालयाचे बेलिफ प्रकल्पग्रस्तांसह मनपात धडकले. ते मनपा आयुक्तांकडे गेल्यानंतर विधी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी मनपाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केल्याची माहिती दिलीे. त्यामुळे ही जप्ती टळली.
न्यायालयाचा आदेश घेऊन बिलिफ मनपात पोहोचल्यामुळे खळबळ उडाली होती. रहाटगाव ते नवसारी रिंगरोड २००० मध्ये तयार करण्यात आला. त्यावेळी बालाजी प्लाॅट येथील एका प्रकल्पग्रस्ताची १ हेक्टर २५ आर जमिनीचे संपादन करण्यात आले. त्यावेळी या जमिनीचे फारच कमी मूल्य प्रकल्पग्रस्ताला दिले जात होते. ते बघता या प्रकल्पग्रस्ताने मनपाच्या विरोधात प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांकडे धाव घेत बाजार मूल्यानुसार दर मिळावे, अशा आशयाची याचिका दाखल केली होती. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्ताला पावणे चार कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा जप्ती केली जाईल, असा आदेश दिला होता.
न्यायालयाच्या चुकीने आली जप्ती ज्या प्रकरणी उच्च न्यायालयात आधीच मनपाने अपील केले आहे, त्याच प्रकरणाची जप्ती न्यायालयाच्याच चुकीने मनपावर आली होती. त्यांना अपील केल्याचे सांगितल्यानंतर ती टळली. - श्रीकांत चव्हाण, विधी अधिकारी, मनपा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.