आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानधनावर शिक्षणाधिकारी पद:मनपाने शिक्षणाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पुन्हा वाढवला

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगर पालिकेने निवृत्त शिक्षणाधिकारी डाॅ. अब्दुल राजीक यांचा कार्यकाळ दुसऱ्यांदा सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. याआधी शिक्षणाधिकारी पदावरच डाॅ.राजीक हे सेवानिवृत्त झाले होते. त्यावेळीही शिक्षणाधिकारी पदासाठी पात्र उमेदवार मनपाकडे नसल्यामुळे त्यांनाच कंत्राटी तत्त्वावर तसेच निश्चित मानधनावर शिक्षणाधिकारी पद देण्यात आले. आता पुन्हा त्यांचा कार्यकाळ सहा महिने वाढविण्यात आला आहे.

या प्रकरणी एक प्रकरण न्यायप्रविष्ट असून, जोवर त्याचा निकाल लागत नाही तसेच डाॅ. राजीक यांचा ६ महिन्यांचा कार्यकाळ यापैकी जो कालावधी कमी असेल तेथवर डाॅ. राजीक हे शिक्षणाधिकारी पदावर राहतील, असे मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...