आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या घटनेची प्रतीक्षा आहे का?:मनपाला अजूनही मिळाला नाही फायर ऑडिटचा मुहूर्त, काही महिन्यांपूर्वी होमिओपॅथी दवाखान्याला लागली होती आग

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवाजी कमर्शियल काॅम्प्लेक्समधील होमिओपॅथी दवाखान्याला काही महिन्यांपूर्वी आग लागली. त्यावेळी वरच्या माळ्यावर 350 विद्यार्थी ट्यूशन क्लासमध्ये उपस्थित होते. त्यांना मागच्या बाजुला असलेल्या ‘फायर एक्झिट’द्वारे बाहेर काढण्यात आले. काही दिवसांपूर्वी जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) नवजात शिशू कक्षाला आग लागली.

अशा घटना शहरात वारंवार घडत असताना मनपाच्या अग्नीशमन विभागाने वारंवार घोषित केल्यानंतरही ‘फायर सेफ्टी ऑडिट’ केले नाही. यावरून एखाद्या मोठ्या घटनेची प्रतिक्षा तर केली जात नाही ना असा प्रश्न शहरवासीयांनी उपस्थित केला आहे.

कालांतराने सर्वकाही थंडावते

शहरात अनेक प्रतिष्ठानांचे अद्याप फायर ऑडिट पूर्ण झाले नाही. एखादी घटना घडली की मनपा अॅक्शन मोडवर येते. त्यानंतर कालांतराने सर्वकाही थंडावते असे फायर सेफ्टी ऑडिटबाबत सातत्याने सुरू आहे.

मोजकेच फायर ऑडिट

फायर ऑडिट करून घेण्यासाठी रुग्णालये, हाॅटेल्स, शिकवणी वर्ग, विविध संस्था, कार्यालयांना मनपाद्वारे जाहीर नोटीस बजावण्यात आली. परंतु, प्रारंभी कोणीही फारसा प्रतिसाद न दिल्याने दोनदा मुदत वाढविण्यात आली. त्यानंतर तिसऱ्यांदा मात्र, आर्थिक दंड व कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला. त्यात शिकवणी वर्गांनी प्राधान्याने फायर ऑडिट करावे अन्यथा त्यांना सील ठोकले जाणार असे या इशाऱ्यात नमूद होते. त्यानंतर सुमारे 30 ते 40 शिकवणी वर्गानी फायर ऑडिटसाठी मनपा अग्नीशमन मुख्यालयातून अर्ज नेले. ते बघता आणखी मुदत वाढविण्यात आली. त्यानंतर काहींनी पुन्हा अर्ज नेले परंतु, फायर ऑडिट करण्याचे पत्र मनपा अग्नीशमन विभागला दिलेच नाही. त्यानंतर कालांतराने ही बाब विस्मरणात गेली. आतापर्यंत केवळ मोजक्याच शिकवणी वर्गानी फायर ऑडिट केले असून काहींनी अर्ज सादर केले आहेत.

एकाही वर्गाला सील नाही

फायर ऑडिट जे शिकवणी वर्ग करून घेणार नाहीत. तसेच ज्यांच्याकडे पुरेशी अग्नीशमन यंत्रणान नसेल त्यांना तत्काळ सील ठोकले जाईल, असे तत्कालीन प्रभारी अग्नीशनम अधीक्षकांनी म्हटले होते. परंतु, अद्याप कोणत्याही शिकवणी वर्गाला सील ठोकण्यात आले नाही.

शिकवणी वर्गांनी केले अर्ज

शहरात मोठ्या संख्येत शिकवणी वर्ग असले तरी केवळ 10 शिकवणी वर्गांनी फायर ऑडिट करण्यासाठी अर्ज दिले आहेत. इतर शिकवणी वर्गांना मनपाद्वारे नोटीस बजावण्यात आली. परंतु, त्याचा कोणताही फायदा झाला नाही, असे अग्नीशमन विभागातील कर्मचाऱ्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...