आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:पाच जणांच्या मृत्यूला मनपाही जबाबदार; लॉजमालक, इतर दोषींवर कारवाई करा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘माझ्या पतीसह चार बांधकाम मजुरांच्या मृत्यूला सर्वाधिक दोषी महापालिका प्रशासन आहे. सोबतच राजेंद्र लॉजचे मालक, नूतनीकरण करून ती इमारत योग्य होईल, असे सांगणारा खासगी अभियंता कारणीभूत असल्याचा आरोप प्रभात चौकातील इमारतीच्या मलब्याखाली दबून मृत्यूमुखी पडलेले रवी परमार यांच्या पत्नी शिल्पी परमार यांनी केला आहे. शुक्रवारी (दि. ४) शहर कोतवाली पोलिसांत त्यांनी या प्रकरणी जबाबसुद्धा नोंदवला आहे.

३० ऑक्टोबरला शहरातील प्रभात चौक स्थित राजेंद्र लॉजची इमारत पडून राजदीप बॅग नामक दुकानाचे व्यवस्थापक रवी परमार यांच्यासह चार मजुरांचा मलब्याखाली दबून मृत्यू झाला होता. त्याअनुषंगाने शुक्रवारी सायंकाळी रवी परमार यांच्या पत्नी शिल्पी यांनी कोतवालीच्या ठाणेदार निलिमा आरज यांची भेट घेतली. राजेंद्र लॉजचे पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम पाडल्यानंतर संपूर्ण मलबा राजदीप बॅग हाऊसच्या स्लॅबवर पडून होता. तो उचलण्याबाबत मनपा प्रशासनाने संबंधितांना का सांगितले नाही.

याशिवाय तळमजल्यावरील पाचही दुकाने पाडून टाकाव्यात, अशी नोटीस महापालिकेने दिली असताना अंमलबजावणी झाली का नाही, हे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी का पाहिले नाही, असा सवाल करून पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष देखील तितकेच कारणीभूत असल्याचे शिल्पी परमार म्हणाल्या. त्यामुळे या प्रकरणात सर्वाधिक दोषी महापालिका असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...