आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकील भावजयीचा नणंदेसह दोन अल्पवयीनांनी गळा दाबून केला खून:घरगुती कारणावरून झाला होता वाद, आत्महत्येचा केला होता बनाव

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती शहरातील व्यकंय्यापुरा भागात राहणाऱ्या एका 40 वर्षीय वकील महिलेला तिच्या नणंदेसह नात्यातील दोन अल्पवयीनांनी गळा दाबून तसेच डोक्यात रॉड मारून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 9) सांयकाळी उघड झाली.

पोलिसांनी या प्रकरणी नणंदेला अटक केली असून, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. घरगुती वादातून हा थरार घडल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सविता सुशील संदनशिवे (40, रा. व्यंकैय्यापूरा) असे मृत वकील महिलेचे नाव आहे. सविता संदनशिवे यांच्या पतीचे दीड वर्षांपुर्वी निधन झाले आहे. त्यामुळे तीन मुलींना घेवून त्या सासरी राहत होत्या. दरम्यान मागील काही दिवसांपासून सासू, त्यांच्या घरी राहणाऱ्या नणंदेसोबत तसेच अन्य दोन अल्पवयीन नातेवाईकांसोबत त्यांचा वाद व्हायचा. सविता यांना 11 वर्ष, 6 वर्ष व 2 वर्ष वयाच्या तीन मुली आहेत. 7 सप्टेंबरला सविता या त्यांच्या बहिणीसोबत एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी शेंदूरजना घाट येथे गेल्या होत्या.

रॉड मारून खून

दरम्यान 8 सप्टेंबरला त्या अमरावतीत घरी परत आल्या. त्यावेळी त्यांच्या नणंदेसोबत त्यांचा पुन्हा वाद झाला. त्यावेळी नातेवाईक असलेले दोन अल्पवयीन मुले सुध्दा घरीच होते. खुनाचा आरोप असलेली ननंद हिचे लग्न झाले असून तिला नाशिक येथे दिले. मात्र, मागील एक ते दीड वर्षांपासून ती माहेरी येवून राहत आहे. दरम्यान या वादामध्येच नणंद व दोन अल्पवयीन मुलांनी सविता यांना मारहाण केली. गळा दाबून तसेच डोक्यावर लोखंडी रॉड मारून त्यांचा खून केला. यावेळी कोणालाही खुनाचा संशय येवू नये म्हणून या तिघांनी सविता यांच्या अंगावर चादर टाकून त्यांच्या हातात एक औषधाची बाटली ठेवून दिली.

सविता यांचा मृत्यू

दरम्यान 8 सप्टेंबरला दुपारी चार वाजताच्या सुमारास सविता यांची मोठी मुलगी घरात आली. तिने आवाज दिले तर सविता या उठल्या नाहीत. मुलीला वाटले आई झोपली आहे. मात्र, काही वेळाने मुलगी पुन्हा परत आली, त्यावेळीसुध्दा त्या उठल्या नाहीत, म्हणून मुलीने तिच्या आजीला म्हणजेच सविता यांच्या सासू चंद्रकला सदंनशिवे यांना सांगितले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती देवून रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती सविता यांना मृत घोषित केले.

खुनाचा गुन्हा दाखल

दरम्यान शुक्रवारी (दि. 9) सविता यांच्या मृतदेहाची पाहणी केली असता त्यांच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा दिसल्या. त्यामुळे मृत्यू संशयास्पद असल्याचे पोलिसांना लक्षात आले. त्यानंतर पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये डोक्याला जबर मार लागून मृत्यू झाल्याचे समोर आले. त्याचवेळी सविता यांच्या भगिनी संगीता नरेंद्र वानखडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ननंद व दोन अल्पवयीन नातेवाईकांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करून नणंदेला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...