आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजना येथील घटना:पत्नीशी प्रेमसंबंधाच्या रागातून तरुणाचा खून ; दोन तासात तिन्ही आरोपींना अटक

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून एका ४५ वर्षीय व्यक्तीने त्याच्या दोन मुलांच्या मदतीने एका ३८ वर्षीय व्यक्तीचा खुन केला. ही घटना मंगळवारी (दि. २०) सकाळी सहाच्या सुमारास चांदूर रेल्वे तालुक्यातील राजना गावात उघड झाली. चांदूर रेल्वे पोलिसांनी मृतकाची ओळख पटवून अवघ्या दोन तासात खूनप्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक केली.अमित नारायण उपाध्याय (३८, रा. सातेफळ, ता. चांदरू ररेल्वे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी एका ४५ वर्षीय व्यक्तीसह त्याच्या दोन मुलांना अटक केली.

अमित उपाध्याय व ४५ वर्षीय मुख्य आरोपीची पत्नी यांच्यामध्ये एक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ती महिला एक वर्षांपासून अमित सोबत राहत असल्याने त्याचा राग मनात धरुन आरोपी पिता-पुत्रांनी अमितचा खून केल्याची माहिती चांदूर रेल्वे पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित सोमवारी उशिरा रात्री एक वाजेच्या सुमारास मारेकऱ्यांच्या घरी आला होता.

त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. तो वाद विकोपाला जावून ४५ वर्षीय आरोपीसह त्याच्या २० व १९ वर्षे वयाच्या दोन मुलांनी त्याला दगड व बांबूच्या काठयांनी मारहाण केली. या मारहाणीत अमितचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्यांना राजना येथून अटक करण्यात आली. ही कारवाई चांदूर रेल्वेचे ठाणेदार सुनील किनगे, एपीआय अनिल पवार व मनोज सुरवाडे, अंमलदार संतोष मोरे, अरविंद गिरी, रवी भुताडे, योगेश नेवारे, चंदु गाडे यांनी ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...