आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकाला 'ती' भेटली आणि त्याच्या प्रेमातच पडली. प्रेमांकुरही फुलला पण दीड वर्षांनी प्रेमाचा काडीमोड झाला. नंतर दुसरा भेटला अन् तिचा त्याच्यावरही जीव जडला! पण तिचेच आधीच एकावर प्रेम होते ही बाब दुसऱ्याला सहन झाली नाही आणि त्याने तिच्या पहिल्या प्रियकरावर चाकूने सपासप वार करुन जीव घेतला. हा रक्तरंजित थरार रविवारी (ता. 5) दुपारी चांगापूर फाट्यावर घडला आहे.
शहरात राहणाऱ्या एका 32 वर्षीय विवाहीत महिलेसोबत शहरातील नवसारी भागातील 31 वर्षीय युवकाचे प्रेम होते. तसेच चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी गावातील 33 वर्षीय तरुणासोबतही काही महिन्यांपूर्वी या महिलेची ओळख झाली व त्यांच्यातही प्रेमांकुर फुलला. दरम्यान रविवारी या महिलेच्या नव्या प्रियकरानेने जुन्या प्रियकराला चाकूने सपासप वार केले यावेळी झालेल्या झटापटीत दोघेही जखमी झाले पण त्यात एकाचा जीव गेला. हा रक्तरंजित थरार चांगापूर फाट्यावर घडला आहे.
नेमके प्रकरण काय?
सचिन विजयराव खरात असे मृत तरुणाचे नाव आहे. तर राजेश पंडीतराव गणोरकर असे आरोपीचे नाव आहे. शहरात राहणारी एक 32 वर्षीय महिला व सचिन खरातचे मागील दीड वर्षांपासून एकमेकांसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. सचिन हा रंगरंगोटीचे काम करत होता. दरम्यान मागील काही महिन्यांपूर्वी याच महिलेची राजेशसोबत ओळख झाली. त्यांच्यातही प्रेमसुत जुळले. राजेश हा शेती करतो. महिलेचे आणि सचिनचे प्रेमसुत असल्याची कल्पना राजेशला होती.
कॉल न उचलल्याने संतप्त
दरम्यान रविवारी सकाळी राजेशने या महिलेला वारंवार फोन केले मात्र तीने राजेशचे फोन स्वीकारले नाहीत. त्यावेळी राजेशने सचिनला कॉल केला. त्याने सचिनला वलगाव मार्गावरील चांगापूर फाट्यावर भेटीसाठी बोलवले. त्यामुळे सचिन चांगापूर फाट्यावर गेला त्याचवेळी राजेशसुध्दा त्याठिकाणी आला. त्यानंतर राजेशने सचिनला त्या महिलेला कॉल करायला सांगितला व चांगापूर फाट्यावर बोलवले. ती महिला काही वेळातच चांगापूर फाट्यावर पोहचली. त्यानंतर सचिन व राजेश यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद वाढला आणि राजेशने चाकू काढला व सचिनवर वार केले. यावेळी राजेशने सचिनच्या छातीवर चाकूचे वार केले. यामध्ये सचिन घटनास्थळीच रक्तबंबाळ होवून मृत झाला.
दोघेही झाले जखमी
याचदरम्यान चाकूचा एक घाव राजेशच्या मांडीत लागल्यामुळे राजेशसुध्दा जखमी झाला. हा संपुर्ण थरार त्या महिलेसमोरच घडला. ही माहीती पोलिसांना मिळताच पोलिसांनी राजेश, सचिन व त्या महिलेला इर्विनमध्ये आणले. त्यावेळी डॉक्टरांनी सचिनला मृत घोषित केले राजेशवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहीती मिळताच गाडगेनगरचे प्रभारी ठाणेदार प्रविण वांगे त्यांच्या पथकासह घटनास्थळी व नंतर इर्विन रुग्णालयामध्ये पोहचले होते. या प्रकरणी राजेशविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.
त्या महिलेचे दोघांसोबत प्रेमप्रकरण
या महिलेचे राजेश व सचिनसोबत प्रेमसंबध होते. यातूनच त्या दोघांमध्ये वाद झाला व राजेशने सचिनवर चाकूने वार करुन त्याचा खून केला. राजेश जखमी असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्यावर लक्ष देण्यासाठी पोलिस इर्विन रुग्णालयामध्ये असल्याचे प्रभारी ठाणेदार प्रविण वांगे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.