आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण:गळ्यावर लाथ मारून पतीकडून पत्नीचा खून, मृत महिलेला 8 महिन्यांचा मुलगा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चांदूर बाजार क्षुल्लक कारणावरून गळ्यावर लाथ व बेदम मारहाण करून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना चांदूर बाजार तालुक्यातील टोंगलापूर येथे घडली. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी मारेकरी पतीला घटनेनंतर काही तासांतच अटक केली. दरम्यान, मृत महिलेला ८ महिन्यांचा मुलगा आहे.

मंजूषा चुन्नू उनके (२४, रा. टोंगलापूर) असे मृत महिलेचे तर पुन्नू शंकरराव उईके (२६) असे मारेकरी पतीचे नाव आहे. उईके कुटुंबीय मध्य प्रदेशाचे आहे. मात्र, पुन्नूचे आईवडील शिरजगाव बंड येथे राहतात. त्यामुळे पुन्नुसुद्धा शिरजगावात राहत होता. दीड वर्षापूर्वी पुन्नूचा मंजूषासोबत विवाह झाला. लग्नानंतर पुन्नू व मंजूषासुद्धा शिरजगाव बंड येथेच राहत होते. पुन्नू गवंडी काम करतो. १५ दिवसांपूर्वी शिरजगाव बंडवरून पुन्नू, त्याची पत्नी मंजूषा व ८ महिन्यांचा मुलगा हे टोंगलापूरला राहायला गेले. पुन्नू आणि मंजूषा या दांपत्यामध्ये नेहमीच वाद व्हायचे. शुक्रवारी रात्रीसुद्धा त्यांच्यात वाद झाला. याच वादातून पुन्नूने मंजूषाला ठार केले.

बातम्या आणखी आहेत...