आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:मटण बनवले नाही; पती म्हणाला, "तलाक, तलाक, तलाक’, पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीने पत्नीला जेवणात मटण बनवण्यास सांगितले, मात्र पत्नीने मटण बनवले नाही. या कारणावरून पतीने पत्नीसोबत वाद घालून तिला मारहाण केली. इतकेच नाही तर आता मला तुझ्यासोबत राहायचे नाही, असे सांगून तीन वेळा तलाक, तलाक, तलाक असे उच्चारून तलाक दिला. हा प्रकार अमरावती शहरातील नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत ४ ऑगस्टला घडला. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध ५ ऑगस्टला रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

रात्रीच्या जेवणात मटण बनवायचे, असे सांगून पती बाहेर गेला. काही वेळानंतर पती घरी आला व त्या वेळी पत्नीने जेवण तयार असल्याचे सांगितले. पत्नीने जेवणात मटण बनवले नसल्याचे पतीच्या लक्षात आले. त्या कारणावरून पतीने पत्नीसोबत वाद घातला. इतक्यावरच पती थांबला नाही, तर त्याने ३० वर्षीय पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर पतीने पत्नीसमोर तीन वेळा तलाक शब्द उच्चारून तलाक दिल्याचे सांगितले. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पत्नीने समजावून सांगिल्यानंतरही पतीने एेकले नाही
पत्नीने पतीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतीने समजून घेण्याऐवजी पत्नीच्या भावाला मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे अखेर पत्नीने नागपुरी गेट पोलिस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या पतीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...