आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकांसोबत आजी आजोबा‎:एन. व्ही. चिन्मया विद्यालयात‎ आजी-आजोबा दिवस उत्साहात‎

शेगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात पालक‎ ,समाज ,शाळा यांचा महत्त्वपूर्ण सहभाग‎ असतो आणि त्यातूनच मुलांची जडणघडण‎ होत असते. आजी-आजोबा आपले‎ बालपण नातवांमध्ये पाहत असतात. लहान‎ मुलांनी कुठे, कसे? वर्तन ठेवावे याचे‎ मार्गदर्शन सतत नातवांना आजी-आजोबा‎ करत असतात. ही परंपरा निरंतर सुरू राहावी‎ यासाठी एन. व्ही. चिन्मय विद्यालयात आजी‎ आजोबा दिवस साजरा करण्यात आला.‎

या कार्यक्रमाला ज्युनिअर केजी व‎ सिनियर केजी या वर्गाचे विद्यार्थी व त्यांचे‎ आजी आजोबा यांचा सहभाग होता.‎ आजी-आजोबांना त्या दिवसाचा आनंद‎ घेता यावा. यासाठी विद्यालयाने आजी‎ आजोबांसाठी खेळांचे आयोजन केले होते.‎ आजी-आजोबांनी खेळांत उत्सफूर्त‎ सहभाग नोंदवला. चिन्मय विद्यालयाचे‎ प्राचार्य किशोर कुलकर्णी यांनी मुलांच्या‎ जडणघडणीत आजी-आजोबांचा‎ प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कसा सहभाग असतो हे,‎ आपल्या शब्दातून पटवून दिले. कार्यक्रम‎ साठी संचालिका प्रतिभाताई व‎ वर्गशिक्षिका यांनी परिश्रम घेतले .‎ विद्यालयात हा कार्यक्रम यशस्वीरित्या‎ पार पाडला.‎

बातम्या आणखी आहेत...