आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 कोटी 63 लाख 16 हजार 260 रुपये अडकले‎:‘नाफेड’ने हरभरा खरेदी‎ केला, पण पैसे प्रलंबितच‎

चांदूर रेल्वे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक शेतकऱ्यांचा हरभरा‎ नाफेडमार्फत खरेदी करण्यात आला‎ खरा. पण त्या व्यवहाराचे पैसे‎ अद्याप संबंधितांना मिळाले नाही.‎ त्यामुळे शासन किती वेळा आणि‎ कशाप्रकारे आम्हाला नाडवणार,‎ असा प्रश्न हरभरा विक्रेत्यांनी केला‎ आहे.‎ ‘नाफेड’ला हरभरा विकण्यासाठी‎ येथील ४ हजार २४० शेतकऱ्यांनी‎ नोंदणी केली आहे. नोंदणी पश्चात‎ १४ मार्चपासून प्रत्यक्ष खरेदी-विक्री‎ सुरु करण्यात आली. दरम्यान,‎ आतापर्यंत ५०० शेतकऱ्यांचे १०‎ हजार ५०० क्विंटल हरभरा पीक‎ खरेदी करण्यात आले. विकलेल्या‎ मालाची किंमत ५ कोटी ६३ लाख १६‎ हजार २६० रुपये होते. तरी अद्यापही‎ ही रक्कम संबंंधित शेतकऱ्यांना‎ मिळाली नाही.

संबंधित‎ शेतकऱ्यांतर्फे वरचेवर खरेदी विक्री‎ सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना‎ विचारणा करण्यात आली. मात्र,‎ पेमेंट अद्याप वरूनच यायचे आहे,‎ याशिवाय दुसऱ्या शब्दात उत्तर दिले‎ जात नाही.‎ पैसा नाही… काय‎ करायचे तेही सूचत नाही‎ मेहनतीने पीक कमावले. वेळेवर‎ सोंगणी केली. बाजारात भाव नाही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ म्हणून त्या पिकाची जपणूकही‎ केली. वारंवार मागणी केल्यानंतर‎ सरकारने कधीकाळी हरभरा खरेदी‎ केंद्र सुरु केले. त्यामुळे पहिली पसंती‎ म्हणून नाफेडला हरभरा विकला.‎ परंतु अद्याप मोबदला मिळाला नाही.‎ हातात पैसा नसल्यामुळे बऱ्याच‎ गोष्टी अडकल्या आहेत,असे चांदूर‎ रेल्वे येथील एका त्रस्त शेतकऱ्याने‎ सांगितले.‎

पैसे लवकरच येणार‎ शेतकऱ्यांच्या खात्यात‎ ‘नाफेड’ला हरभरा विकल्यानंतर‎ त्या मालाची रक्कम लवकरच प्राप्त‎ होते. ज्या ५०० शेतकऱ्यांनी त्यांचा‎ हरभरा नाफेडला विकला, त्यांचेही‎ पैसे प्राप्त झाले आहेत. सध्याच्या‎ स्थितीमध्ये शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या‎ खात्यामध्ये जमा व्हायचे आहे.‎ मात्र, लवकरच ते केले जातील.‎ -सुरेश ढाकुलकर , सचिव,खरेदी‎ विक्री संघ चांदूर रेल्वे.‎