आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरभराखरेदी:धामणगाव रेल्वेत ‘नाफेड’ची हरभराखरेदी आजपासून पुन्हा सुरू होणार ; दीड हजारांवर शेतकरी, खरेदीचे उद्दिष्ट

धामणगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील तेरा दिवसांपासून बंद पडलेली ‘नाफेड’ची हरभरा खरेदी गुरुवारपासून (दि.१६) पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, तालुक्यात दीड हजाराच्यावर शेतकरी असले तरी हरभरा खरेदीचे उद्दिष्ट फक्त सत्तावीसशे क्विंटलचे असल्याने शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी होणार कसा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाकडून २४ मे रोजी बंद पाडलेली खरेदी ३० मे रोजी सुरू करण्यात आली होती व चार दिवसांतच पुन्हा एकदा हरभरा खरेदीचे केंद्राचे ऑनलाइन पोर्टल बंद पडल्याने ३ जूनपासून विदर्भ को ऑफ मार्केटिंग फेडरेशनने हरभरा खरेदी बंद केली होती. दरम्यान, तालुक्यात नंबर लावलेल्या एकूण ४००९ शेतकऱ्यांपैकी २ हजार ५२८ शेतकऱ्यांचा ५५ हजार ७६६ क्विंटल ५९ किलो हरभरा खरेदी करण्यात आला आहे. यामध्ये एकूण हरभरा विक्री केलेले शेतकरी ३२३४ असून, अद्यापही १४८१ शेतकऱ्यांना हरभरा खरेदी केंद्राचा निरोप सुद्धा गेलेला नाही. ३जूनपर्यंत शेवटच्या तीन दिवसात निरोप गेलेल्या शेतकऱ्यांपैकी १५० ते २०० शेतकऱ्यांचा हरभरा अद्यापही मोजलेला नाही. केंद्राचे पोर्टल काही काळ सुरू झाले असले तरी विदर्भ को ऑफ मार्केटिंग फेडरेशनला गुरुवारपासून सुरू होणाऱ्या खरेदीचे सर्वच केंद्रांसाठी केवळ ८ हजार क्विंटलचे उद्दिष्ट दिले असल्याची माहिती विदर्भ को ऑफ मार्केटिंग फेडरेशनचे पणन व्यवस्थापक उमेश देशपांडे यांनी दिली. यापैकी तालुक्याला फक्त २ हजार ७०० क्विंटल हरभरा खरेदी करावा, असे स्पष्ट आदेशित करण्यात आले आहे. निरोप गेलेल्या दोनशेच्या जवळपास शेतकऱ्यांचा माल मोजमाप केला तरी ३ हजार क्विंटलची आवक होत असल्याने निरोपही न गेलेल्या १४८१ शेतकऱ्यांनी कुठे जावे, हा सवाल शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. सत्तावीसशे क्विं. हरभरा खरेदी करण्याचे आदेश खरेदीचे उद्दिष्ट वाढवून घेण्यासाठी प्रयत्न शासन स्तरावरून केंद्राची हरभरा खरेदी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते व खरेदी सुरू झाली आहे. परंतु खरेदीचे एकूण मात्र उद्दिष्ट आठ हजार आहे. हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढवून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रताप अडसड, आ.,धामणगाव रेल्वे.

बातम्या आणखी आहेत...