आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, विदर्भ ते कोकण जोडणारी ही गाडी आता ३० ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे. विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव आठवड्यातून दोनदा धावणारी ही रेल्वे सप्टेंबर अखेरपर्यंत साेडण्यात येणार होती.
मात्र या गाडीची मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी ३० ऑक्टोबरपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर ते मडगावपर्यंत चालवली जाणार आहे. त्यानुसार ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी ३ वाजून पाच मिनिटांनी सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता पोहोचणार आहे. मडगाव ते नागपूर दरम्यान धावणारी ही गाडी गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता ती नागपूरला पोहोचेल.
मडगाव ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता ती नागपूरला पोहोचेल. नागपूर ते मडगाव या प्रवासात ही गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव रेल्वे, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.
एक महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून १८ फेऱ्या होणार आहेत. नागपूर ते मडगाव सुपरफास्ट एक्स्प्रेसचा परिसरातील अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवासी संघटना शेगाव अध्यक्ष शेखर नागपाल, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष राजकुमार व्यास, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगाव अध्यक्ष शबनम शेख, वैभव बहुतूले, ओमकार माळगावकर, हर्षद भगत, अभिजीत धुरत, सूर्यकांत वाघमारे, सुधीर राठोड, दीपक सोनवणे यांनी केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.