आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:सरकारी बोर्डावर लिहिले ‘विदर्भ शासन’चे नाव; विदर्भ राज्य आंदोलन समितीने महाराष्ट्रदिनी पाळला विश्वासघात दिवस, विदर्भ राज्याची मागणी

दर्यापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या दर्यापूर शाखेतर्फे महाराष्ट्र दिन विश्वासघात दिवस म्हणून पाळला गेला. त्यानिमित्त शहरातील अनेक शासकीय फलकांवर “विदर्भ शासन”नावाचे बोर्ड लावले गेले.

२८ सप्टेंबर १९५३ ला विदर्भाला जबरदस्तीने महाराष्ट्रात सामील करून घेतले. १ मे १९६० ला महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. तेव्हा एक करार करण्यात आला होता. त्यामध्ये विदर्भाचा २३ टक्के वाटा राहील, असे ठरले होते. परंतु असे असतानाही महाराष्ट्र सरकारने तो करार गेल्या ६२ वर्षांमध्ये पाळला नाही. त्यामुळे विदर्भावर फार मोठा अन्याय झाला. विदर्भात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पन्न होते. परंतु सूतगिरण्या व कापड कारखाने पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला आले. आजपर्यंतच्या सरकारांकडून विदर्भासोबत विश्वासघात करण्यात आला. म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १ मे हा दिवस विश्वासघात दिवस पाळून केंद्र सरकारकडे वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करण्यात आली, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

आंदोलनात युवा अध्यक्ष अमोल कंटाळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील साबळे, ज्येष्ठ नेते विष्णूदास काळमेघ, रवींद्रसिंह ठाकूर, अशोक राणे, गणेशराव अरबट, बाळासाहेब वडतकर, निखिल भायने, संतोष गायकी यांच्यासह अनेक विदर्भवादी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...