आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदगाव खंडेश्वर शहरात 15 दिवसांआड पाणीपुरवठा:ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होऊनही समस्या ‘जैसे थे’

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

7 वर्षांपुर्वी नांदगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. मात्र अद्यापही 33 वर्षांपासूनची पाणी समस्या ‘जैसे थे’च आहे. आजही शहरवासीयांना 15 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरातील ही पाण्याची समस्या सुटणार तरी कधी, असा प्रश्न नांदगाव खंडेश्वरवासियांकडून उपस्थिती केला जात आहे.

पाण्याचे नियोजन कमी आणि लोकसंख्या जास्त अशी शहराची अवस्था झाली आहे. त्यातच ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात जमिनीमधील पाईपलाईन व त्यावर असलेले 64 व्हॉल्व्ह असलेली पाईप लाईन अद्यापही कायम असल्याने शहरातील पाणी समस्या दिवसागणिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. व्हॉल्व्ह, पाईपलाईन व पाण्याच्या स्रोताअभावी पाण्याची समस्या आता प्रचंड वाढत असल्याने नागरिकांनी स्वतः लाखो रुपये खर्च करीत बाेअर करून स्वतःसाठी पाण्याची व्यवस्था केली.

चांदी प्रकल्प योजना कुचकामी

त्यामध्ये काहींना पाणी लागले, तर काहींच्या हातात दगडाशिवाय काहीही आले नाही. आजही नागरिकांना स्वत:च पाण्याची व्यवस्था करावी लागत असल्याने 10 कोटींचा चांदी प्रकल्प योजना कुचकामी ठरल्याचे चित्र शहरातील 15 दिवसाआड होणारा पाणी पुरवठा पाहून लक्षात येते.

पाण्यासाठी हजारो रुपये

ग्रामपंचायत काळात पाण्यासाठी 10 कोटी रुपयांची योजना आली होती. मात्र वर्षातील तीन महिने सोडले, तर उर्वरित नऊ महिने भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो, शहरात बरेच ठिकाणी नवीन वसाहती तयार झाल्यात. मात्र तिथपर्यंत साधी पाईपलाईन सुद्धा पोहोचली नाही. तेथील नागरिकांना नाइलाजाने पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची वेळ आली आहे.

पाण्याचा संघर्ष मिटणार तरी कधी

21 हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या नगर पंचायतीकडून वर्षांचा पाणी पट्टी कर वसुल केला जातो. मात्र पाणी पुरवठा केवळ वर्षातील नऊ महिने महिन्यातून दोन वेळा केला जाता. त्यामुळे नागरिक पाण्याच्या समस्येमुळे वैतागले असून पाण्याचा संघर्ष मिटणार तरी कधी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कमी जास्त विद्युत दाबामुळे समस्या

पाणीपुरवठा अधिकारी अभिजित लोखंडे म्हणाले, विद्युत दाब कमी जास्त राहत असल्याकारणाने नियमित मोटार पंप चालू राहत नाही. त्यामुळे मुख्य स्त्रोतातून जलसाठा अपूर्ण होत आहे. त्यामुळे शहरात पाणी पुरवठ्यासाठी विलंब होत आहे. संबंधित विभागाशी पत्रव्यवहार सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...