आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछंद जोपासण्यासाठी शहरातील एका पन्नास वर्षीय छायाचित्रकाराने सायकलने ३२०० किलोमीटर प्रवास करून नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. हा प्रवास आटोपून नुकतेच ते छायाचित्रकार शहरात पोहोचले. शहरातील गाडगे नगर भागात राहणारे शशी ठवळी मागील पाच वर्षांपासून सायकल चालवतात. रोज सुमारे ४० ते ५० किलोमीटर सायकल चालवणे ही बाब त्यांच्यासाठी नित्य नेमाची आहे. दरम्यान सायकलने लांब पल्ल्याचा प्रवास करायचा, असे त्यांनी ठरवले. यासाठीच काश्मीर ते कन्याकुमारी शशी ठवळी जाणार होते. त्यांच्यासोबत शहरातील एक ज्येष्ठ सायकलपटू सुद्धा सहभागी होणार होते.
मात्र ऐनवेळी त्यांच्या सहकाऱ्यांना आरोग्याच्या कारणास्तव जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे ठवळी यांनी नर्मदा परिक्रमा सायकलने पूर्ण करण्याचे ठरवले. त्यासाठी १ जानेवारी २०२३ रोजी ठवळी यांनी मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथून नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली. परिक्रमेदरम्यान दररोज सुमारे १२० ते १५० किलोमीटर सायकल चालवून त्यांनी २९ व्या दिवशी म्हणजेच २९ जानेवारी २०२३ ला ओंकारेश्वर येथेच नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत कोणीही सहकारी नव्हते ही संपूर्ण परिक्रमा ३ हजार २०० किलोमीटर झाली असल्याचे ठवळी यांनी सांगितले आहे.
वेळेवर ठरवले नर्मदा परिक्रमा करायची नर्मदा परिक्रमा सायकलने करायची असे ठरवले नव्हते. काश्मीर ते कन्याकुमारी प्रवासासाठी जाणार होतो, मात्र सहकारी आरोग्याच्या कारणास्तव येवू शकले नाही म्हणून मी अगदी वेळेवर नर्मदा परिक्रमा करण्याचे ठरवले व सायकलने एकट्यानेच ती पूर्ण केली आहे. -शशी ठवळी. गुजरातमध्ये तीन दिवस करावी लागली प्रतीक्षा नर्मदा परिक्रमा करत असताना मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात अशा तीन राज्यातून प्रवास त्यांनी प्रवास केला. गुजरातमध्ये काटकोर येथे काही अंतर बोटीतून प्रवास करावा लागतो. मात्र वातावरण योग्य नसल्यामुळे दोन दिवस बोट सुरू नव्हती, त्यामुळे दोन ते तीन दिवस त्याच ठिकाणी थांबावे लागले.
गुजरातमध्ये तीन दिवस करावी लागली प्रतीक्षा नर्मदा परिक्रमा करत असताना मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात अशा तीन राज्यातून प्रवास त्यांनी प्रवास केला. गुजरातमध्ये काटकोर येथे काही अंतर बोटीतून प्रवास करावा लागतो. मात्र वातावरण योग्य नसल्यामुळे दोन दिवस बोट सुरू नव्हती, त्यामुळे दोन ते तीन दिवस त्याच ठिकाणी थांबावे लागले.
नर्मदा परिक्रमादरम्यान शशी ठवळी त्यांच्या सायकलसह वेळेवर ठरवले नर्मदा परिक्रमा करायची नर्मदा परिक्रमा सायकलने करायची असे ठरवले नव्हते. काश्मीर ते कन्याकुमारी प्रवासासाठी जाणार होतो, मात्र सहकारी आरोग्याच्या कारणास्तव येवू शकले नाही म्हणून मी अगदी वेळेवर नर्मदा परिक्रमा करण्याचे ठरवले व सायकलने एकट्यानेच ती पूर्ण केली आहे. -शशी ठवळी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.