आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभविष्यात अशनीपासून पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो. नासाचं डार्ट हे अंतराळ यान डायमॉर्फस या अशनीवर आदळणार आहे. हा आघात मुद्दाम घडवला जात आहे. हा आघात भारतीय वेळेनुसार, मंगळवार, २७ सप्टेंबर २०२२ रोजी पहाटे ०४ वाजून ४४ मिनिटांनी घडून येणार आहे. या खगोलीय घटनेचे लाईव्ह चित्रण पाहणे शक्य असून मराठी विज्ञान परिषदेच्या स्थानिक शाखेने त्यासाठी विशेष सोय उपलब्ध करुन दिली आहे.
डिडीमॉस हा छोटा अशनी डायमॉर्फस या मोठ्या अशनी भोवती चंद्रासारखा प्रदक्षिणा घालतो आहे. डार्ट यानाच्या डायमॉर्फसशी होणाऱ्या या टकरीचा उद्देश अशनीच्या कक्षेत होणारा बदल अभ्यासणे, हा आहे. या आघाताचं चित्रण डार्ट यानावरच्या ड्रॅको या कॅमेऱ्याद्वारे केले जाईल. भविष्यात जर कधी एखादा अशनी पृथ्वीवर आदळणार असला, तर आदळण्याआधीच त्याचा मार्ग बदल करण्यासाठी हा अभ्यास उपयोगी पडणार असून त्यादृष्टीने ही मोहीम आखण्यात आली आहे.
या घटनेचे थेट प्रक्षेपण पहाटे तीन वाजता सुरू होईल. हौशी विद्यार्थी व अभ्यासकांना ते एका विशिष्ट लिंकद्वारे आपापल्या मोबाइलद्वारे पाहता येईल, असे मराठी विज्ञान परिषद अमरावतीचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने यांचे म्हणणे आहे. गुल्हाने म्हणाले, डायमॉर्फसचा आकार सुमारे १७० मीटर असून, डिडीमॉसचा आकार ८०० मीटर इतका आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.