आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रथमच घेण्यात आलेली राष्ट्रीय योगासन स्पर्धा देशभरातील ३३० योगपटूंनी गाजवली. आगळावेगळा उपक्रम म्हणून यावेळी ही स्पर्धा घेतली.
योग आपल्या संस्कृतीचा अभिन्न घटक असून समाजातील प्रत्येकाने योग आत्मसात करावा याकरिता राष्ट्रीय स्तरावर योगची चळवळ राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे प्रथमच आयोजन केले.
स्पर्धेत महाराष्ट्रासह कोलकाता, मध्य प्रदेशातील भोपाळ, इटारसी, मणीपूर, बिहार, उत्तर प्रदेश येथील तब्बल ३३० स्पर्धकांनी सहभाग घेतला. सकाळी ७ ते रात्री ७ पर्यंत आयोजित या स्पर्धेत ७-९, १०-१४, १४-१८, १९-२५, २६-३५ आणि ३६-७० अशा सहा वयोगटांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत यवतमाळ, वरुड, पुणे, मोर्शी, परतवाडा येथील ८ परीक्षक यांनी योगपटूंच्या नैपुण्याचे परीक्षण केले. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ११ वाजता मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी चेंडके यांच्या हस्ते झाले. यावेळी डीसीपीईचे प्राचार्य डॉ. अजयपाल उपाध्याय, आंतरराष्ट्रीय योगगुरू डॉ. अरूण खोडस्कर, ज्येष्ठ योग मार्गदर्शक डॉ. सूर्यकांत पाटील, योग विभाग प्रमुख डॉ. सुनील लाबडे उपस्थित होते.
या स्पर्धेच्या यशासाठी प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनात योग विभाग प्रमुख सुनील लाबडे, डॉ. नितीन काळे, प्रवीण अनासाने, प्रमोद शिरभाते, प्रणय पवार, प्रतिक पाथरे, संदीप मांदळे, अंकित स्नेह, शुभम कुमार, कृष्णा नंदन कुमार यांच्यासह योग विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सामूहिक योगासोबतच योगासन स्पर्धाही
आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी सामूहिक योगासनांसह साजरा केला जातो. परंतु, त्याऐवजी राष्ट्रीय स्तरावरील उत्तम योगपटूंसाठी स्पर्धा घेतली तर त्यापासून सर्वसामान्यांनाही प्रोत्साहन मिळेल. या उद्देशाने एचव्हीपीएमने जागतिक योगदिनाच्या आठवडाआधी राष्ट्रीय योगासन स्पर्धा आयोजित केली.
-डॉ. अरुण खोडस्कर, सरकार्यवाह, बृहन महाराष्ट्र योग संघटना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.