आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी आक्रमक:‘अग्निपथ’ विरोधात राष्ट्रवादी आक्रमक ; राजकमल चौकात निदर्शने

अमरावती7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाने सैन्य दलाचा अपमान केला आहे. अग्निपथ सारखी योजना राबवण्यात येणार आहे. या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्या नेतृत्वात सोमवारी राजकमल चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र शासनाविरोधात तीव्र नारेबाजी केली. तसेच अग्निपथ योजना रद्द करावी,अशी मागणी ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेला आता देशभरातून विरोध होत आहे. या योजनेंतर्गत आता तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात काम करता येणार आहे. या सैनिकांना अग्निवीर म्हणून संबोधिले जाईल. यातील फक्त २५ टक्के तरुणांनाच सेवेत कायम केले जाईल. त्यामुळे या योजनेचा देशभरात विरोध होत आहे. ही योजना भारतीय लष्कराचे खासगीकरण करणारी असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे म्हणणे आहे. अग्निपथ विरोधात संपूर्ण युवा वर्ग रस्त्यावर उतरले. या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राजकमल चौकात अग्निपथ योजनेचा निषेध व्यक्त करित निदर्शने केली.

यावेळी केंद्र शासनाविरोधात तीव्र नारेबाजी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत डवरे, नितीन ठाकरे, संगीता ठाकरे, सरला इंगळे, गुड्डू धर्माळे, रतन डेंडुले, बिट्टू ठाकरे, सनाउल्ला खान, ऋतुराज राऊत, सुशील गावंडे, निखिल ठाकरे, सचिन जगताप, प्रतीक भोकरे, कपिल यादगिरे, संकेत अडसपुरे, जयश सोनोने, दिग्विजय गायगोले, श्रेयस पेठे, प्रणव हिवरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...