आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्रमक:वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी  आक्रमक; राजकमल चौकात दिले धरणे

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्राचा कष्टकरी, सामान्य नागरिक शेतकरी विरोधी धोरणामुळे संपूर्ण देश महागाईच्या आगीत होरपळून निघत आहे. जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावण्यात आल्याने सामान्य जनतेचे जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे जनसामान्यांच्या मनात प्रचंड आक्रोश आहे. जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके यांनी यावेळी दिला.

वाढत्या महागाई व जीएसटी विरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शनिवारी राजकमल चौकात धरणे आंदोलन केले. यादरम्यान आंदोलकांनी केंद्र शासना विरोधात तीव्र निदर्शने केली. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून डिटेन केले. त्यांनतर काही वेळाने आंदोलकांना सोडण्यात आले.

केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार वर सडेतोड टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावेळी केली. २००४ ते २०१४ पर्यंतच्या युपीए सरकारने जनतेच्या कल्याणाची धोरणे आखली. तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी कृषी क्षेत्र समृद्ध केल्याने आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत मोठा निर्यातदार देश बनला. तत्कालीन युपीए सरकारकडे चांगले धोरण असल्याने अनेक प्रश्न सुटले. मात्र, आता या विपरीत स्थिती देशात निर्माण झाल्याने जनतेचे जगणे असह्य झाले आहे. मोदी सरकारने घेतलेले निर्णय सामान्य जनताविरोधी आहेत ते केवळ भांडवलदार वर्गाचे हीत जोपासत असल्याचे शरसंधान राष्ट्रवादी नेत्यांनी यावेळी सोडले आहेत.

तसेच विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच कामगार, मजुरांकडे काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. परंतु, राज्यातील नवीन शिंदे- फडणवीस सरकारचे जनतेच्या हिताचा कोणताच निर्णय घेतला नाही. सरकार शेतकऱ्यांच्या व्यथांना घेऊन संवेदशील नसल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाला वठणीवर आणण्यासाठी जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रवक्ता तथा विभागीय समन्वयक संजय खोडके यांनी यावेळी दिला. तत्पुर्वी, आंदोलनात कार्यकर्त्याकडून भाजप विरोधात तीव्र घोषणा दिल्यात. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी डिटेन केले. त्यांनतर सर्व आंदोलकांना सोडून देण्यात आले.

यामध्ये शहराध्यक्ष प्रशांत डवरे, माजी महापौर ऍड. किशोर शेळके, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश मार्डीकर, माजी नगरसेवक रतन डेंडूले, लकी नंदा, भूषण बनसोड, प्रवीण मेश्राम, प्रशांत महल्ले, जयश्री मोरे, सपना ठाकूर, मंजुश्री महल्ले, विजय बाभुळकर, ममता आवारे, के. एम.अहमद, अब्दुल सत्तार राराणी, डॉ. गणेश खारकर, प्रा. डॉ. हेमंत देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सुशील गावंडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश हिवसे, नीलेश शर्मा, अशोक हजारे, गजानन बर्डे, सुनील रायटे, संजय बोबडे, दिनेश देशमुख, पप्पूशेठ खत्री, अॅड. सुनील बोळे, प्रमोद सांगोले, दीपक कोरपे, मनीष देशमुख, मनोज केवले, राजाभाऊ चौधरी, जितेंद्रसिंह ठाकूर, किशोर भुयार, किशोर देशमुख, प्रा. डॉ.अजय बोंडे, भोजराज काळे, प्रमोद महल्ले, योगेश सवई, प्रशांत पेठे, बंडू निंभोरकर, आकाश वडनेरकर, रवी भैसे, सतीश चरपे, संकेत बोके, प्रणय हिवसे, प्रथमेश बोके, अंकित राजगुरे, कीर्ती कोरडे, मीनल सवई, छबू मातकर,अंजली चौधरी आदी सहभागी झाले होते.

केंद्र शासनाच्या विरोधात एल्गाराची आंदोलनाद्वारे सुरुवात
देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहे. भारतीय संविधानांना अभिप्रेत राहून देश चालत आला आहे. मात्र, गेल्या १० वर्षाच्या मोदी सरकारच्या काळात घटनेतील कलमांची पायमल्ली होत आहे. नोटबंदी, जीएसटी सारख्या निर्णयाने सामान्य जनतेला वेठीस धरले असून जीवनावश्यक वस्तूवर लावलेल्या जीएसटीमुळे जनता महागाईने भरडली जात आहे. राष्ट्रवादीने महागाई विरुद्ध आंदोलन छेडून केंद्र शासना विरोधात एल्गार पुकारला आहे. प्रशांत डवरे,शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

बातम्या आणखी आहेत...