आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील सव्वादोन वर्षांपासून कार्यरत अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांची बृहन्मुंबई येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी नागपूर येथे सध्या कार्यरत अप्पर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची अमरावती पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
राज्यातील अप्पर पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, तसेच पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी मंगळवारी जारी करण्यात आली. यानुसार अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांची बृहन्मुंबई येथील सशस्त्र पोलfस दलाच्या अप्पर पोलिस आयुक्त म्हणून बदली केली आहे. तर नागपूर येथील अप्पर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची अमरावती पोलिस आयुक्त म्हणून बदली केली आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार, अशी चर्चा सुरू होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.