आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाझ्यावर अत्याचार करून मला जेलमध्ये टाकले. तिथे दुसऱ्या महिलांना चार-चार वेळेस पाणी प्यायला मिळायचे. मला एकदाही प्यायला पाणी मिळाले नाही, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्या अमरावतीमध्ये आयोजित हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी आमदार रवी राणा आणि कार्यकर्त्यांसह त्यांनी हनुमान चालिसाचे पठण केले.
नवनीत राणांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे सोन्याच्या ताटात जन्माला आल्याचे त्या म्हणाल्या. संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. मुख्यमंत्री असताना त्यांनी माणुसकी गाडली, असा आरोप केला.
मला तोडू शकले नाहीत...
नवनीत राणा म्हणाल्या, माझी लहान मुले मला विचारत होते. आई तू काय केले. तुला कशाला आत टाकले. मला विश्वास होता, जी लढाई लढायला सुरुवात केली होती, मी ती लढाई लढण्यासाठी आतमध्ये गेले नव्हते. लढण्यासाठी मुंबईत पाऊल ठेवले नव्हते, पण माझा विश्वास ते तोडू शकले नाहीत. माझ्यावर अत्याचार करून जेलमध्ये टाकले. जेलमध्ये दुसऱ्या महिलांना चार वेळेला पाणी मिळायाचे. मला एकदाही मिळायचे नाही. पण मला ते तोडू शकले नाहीत.
तुम्ही मोठ्या घरात जन्मला...
नवनीत राणा म्हणाल्या, माझा विश्वास होता. माझ्या रामलल्लासाठी, हनुमंतासाठी मी प्रण केला. मी प्रण घेतला की, प्रत्येक दिवशी एकशे एक वेळेस हनुमान चालीसाचे पठण करून मी देवाला एकच विनंती केली. माझा तुमच्यावरचा विश्वास तुटू देऊ नका. तिथेच मी प्रण केला, बाहेर आल्यानंतर १११ फुटी मूर्ती उभी करेन. उद्धव ठाकरेजी तुम्ही सोन्याच्या ताटामध्ये मोठ्या घरात जन्म घेतला. मात्र, आमच्या देवावरचा विश्वास कोणीही संपवू सकत नाही. तुम्ही अत्याचार केला असेल, लोक तुमच्या नावाने घाबरत असतील. मात्र, नवनीत राणा, रवी राणा देवाला माननारे आहेत. आम्हाला हनुमंताचा आशीर्वाद आहे. आम्हाला कुणाचीही भीती नाही.
आमदार सांभाळले नाहीत...
नवनीत राणा म्हणाल्या, रवी राणा मला भेटायला आले. तेव्हा जेलमध्ये दिवस घालवलेल्या कोणती बायको आहे जिचे अश्रू थांबतील. माझ्या जीवन साथीवर बोट उचलले. 'एमआरआय'वरही बोट उचलले. काही केले बोट उचलले. मी एक गोष्ट सांगून देते उद्धव ठाकरेजी. तुमचा घमंड, विश्वास अटीट्यूड...रामलल्लाने भल्याभल्यांची घमेंड तोडली. तुम कौनसी खेत की मुली है. तुम्ही ५६ वर्षांच्या ज्या परिवारात जन्माला आले, ते घर तुम्ही सांभाळून ठेवू शकला नाही. ज्या विचारधारेवर ४० आमदार निवडून आले. ते तुम्ही सांभाळून ठेवू शकला नाही. उद्धवजी ज्या विचारधारेसाठी बाळासाहेब ठाकरेंनी जीवाचे रान केले, रक्ताचे पाणी केले. ती विचारधारा तुम्ही घरात ठेवू शकले नाही. माणुसकीला गाडण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.