आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयघोष:2500 भाविकांनी केले हनुमान चालिसा पठण, नवनित राणा यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत हनुमान जयंतीचा उपक्रम

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत आयोजित हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमात सुमारे 2500 भाविकांनी सहभाग घेतला. सकाळी 9 वाजता भाविकांनी हनुमान चालिसेचे पठण केले. हनुमान चालिसा कार्यक्रमाच्या पोस्टर्स आणि त्यावरील उद्धव ठाकरे यांच्या टीकेमुळे चर्चेत असणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी शहरभर हनुमान चालिसा पुस्तीकांचे वाटप केले.

श्री हनुमान चालिसा टॅरिटेबल ट्रस्ट, अमरावतीद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वच वयोगटातील नागरिक उपस्थित होते. प्रभू श्रीरामांची प्रतिमा तसेच हनुमानाच्या प्रतिमेपुढे भजन कीर्तनासह हनुमान चालीसा पाठ करण्यात आला. यावेळी परिसरातील वातावरण चांगलेच धार्मिक झाल्याचे भासत होते. कार्यक्रमानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.

हनुमानाच्या मूर्तीची स्थापना

शहरातील भानखेड मार्गावर छत्रीतलावाजवळ राणा दाम्पत्याद्वारे 111 फूट श्री हनुमंताच्या मूर्तीची स्थापना केली जाणार असून या स्थापनेचे भूमिपूजन 28 एप्रिल रोजी होणार आहे. या संदर्भातही सामूहिक हनुमान चालीसा पाठ स्थळी माहिती देण्यात आली.

शहरात हनुमान जयंतीचा उत्साह

चैत्र पौर्णिमा गुरुवार 6 एप्रिल रोजी शहरासह जिल्हाभरात श्री हनुमान जयंती साजरी झाली. जिल्ह्यातील सर्वच मंदिरांमध्ये जय हनुमान ग्यान गुण सागर, जय बजरंगबली हनुमान असा जयघोष सुरू होता.

कुठे हनुमान चालिसा पाठ तर कुठे अखंड रामायणाचे स्वर सकाळी कानावर पडत होते. पहाटे श्री हनुमानजीचा जन्म झाल्यानंतर अखंड रामायण पाठाची पुर्णाहूती व नंतर महाप्रसाद वितरण सुरू झाले.

मंदिरांमध्ये सजावट

मंदिरांमध्ये फुले, पताका, विद्युत रोशनाईद्वारे सजावट करण्यात आली. मोठे प्रवेशद्वार, ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या वितरणाची तयारी, प्रसाद वाटपाची तयारी सुरू असल्याचे दृश्य दिसत होते.