आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकधी हिंदू शेरणी बॅनरमुळे तर कधी बुलेटराइड अशा वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत राहणाऱ्या खासदार नवनीत राणांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यात नवनीत राणा यांनी अमरावतीत एका उत्सवादरम्यान प्रसादाच्या पोळ्या लाटल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यात झालेल्या जयसिंग महाराज उत्सवादरम्यान भाविकांसाठी स्वयंपाक करणाऱ्या महिलांसोबत हसत, गप्पा मारत नवनीत राणा यांनी गोल गरगरीत पोळ्या लाटल्या आणि तव्यावर खूसखूशीत भाजल्याही. यावेळी उपस्थित महिलांनी त्यांचे फोटोही काढले.
सोशल मीडियावर चर्चा
खासदार नवनीत राणा कायम कोणत्या न कोणत्या पोस्टमुळे चर्चेत असतात. याआधी रामनवमी दिवशी भगवा गमछा आणि जय श्रीरामचे नारे देत केलेल्या बुलेट राईडच्या व्हिडीओचीही चांगलीच चर्चा होती. यानंतर भाविकांसाठी उत्सवात देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या पोळ्या लाटतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होतोय.
संदीप भूजबळ यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर ट्विट केला आहे.
https://twitter.com/hashtag/prasad?src=hashtag_click
@SandeepBhujaba2
संबंधित वृत्त
बुलेटस्वारी VIRAL VIDEO:नवनीत राणांच्या नव्या अंदाजाची चर्चा; भगवे उपरणे, काळा ड्रेस अन् भरधाव बुलेटवर जय श्रीरामचे नारे
रामनवमीच्या निमित्ताने खासदार नवनीत राणा यांचा बुलेटवरील नव्या अंदाजातील व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. डोक्याला भगवे उपरणे, काळा ड्रेस, जय श्रीरामच्या गजरासह बुलेटस्वारी केलीय.वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.