आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार नवनीत राणा यांच्या राड्यानंतर पोलिस कुटुंबियांचे आंदोलन:केंद्रात तुमचे सरकार, मग पोलिसांची सुरक्षा घेता कशाला

अमरावती22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"पोलिसांचा एवढाच राग करताय ना, मग तुम्ही खासदार आहात, केंद्रात तुमचे सरकार आहे, मग पोलिसांची सुरक्षा काढून टाका, कशाला पोलिसांची सुरक्षा घेता?" असा सवाल करत पोलिसांच्या कुटुंबियांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात निदर्शने केली. अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून काल नवनीत राणा यांनी पोलिस ठाण्यात जाऊन हुज्जत घातली होती.

पोलिस ठाण्यात असताना नवनीत राणा यांनी पोलिसांना अपमानास्पद वागणूक दिली. तसेच शासकीय कामात देखील अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटनेच्या वतीने नवनीत राणा यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले.

पोलिस कुटुंब रस्तावर

नवनीत राणा यांनी काल पोलिसांसोबत हुज्जत घातल्यानंतर, पोलिस ठाण्यामधील राड्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. यावेळी राणा यांनी पोलिसांसोबत अपमानास्पद वागणूक दिली. त्याचा निषेध म्हणून पोलिसांचे कुटुंबीय रस्तावर उतरल्याचे पाहायला मिळाले. राणा यांनी शासकीय कामात अडथळा आणला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. तसेच राणा यांनी वारंवार पोलिसांबद्दल अपमानास्पद बोलणे टाळाव, अशी मागणीही महाराष्ट्र पोलिस भरती संघटनेच्या वतीने करण्यात आली.

सुरक्षा घेण्याचा अधिकार नाही

नवनीत राणा या खासदार आहे, केंद्रामध्ये त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांची सुरक्षा काढून टाकली पाहिजे. त्यांना पोलिसांची सुरक्षा घेण्याचा कोणताच अधिकार नाही. तुमच्या पाठीमागे फिरणार हे शासकीय पोलिस कर्मचारी आहे. कोणतेही सण उत्सवात ते आमच्यासोबत नसता, ते तुमच्या सुरक्षेत सोबत असतात. आमचे पोलिस हे मेहनत करून पोलिस दलात पोहोचले आहे. तुमच्यासारखे राशन वाटून मोठे झाले नाही, अशी टीकाही यावेळी पोलिस कुटुंबियांनी केली.

नेमके प्रकरण काय?

अमरावतीमध्ये राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 19 वर्षे वयाची तरुणी मंगळवारी रात्री बेपत्ता झाली होती. त्या संदर्भात तरुणीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली होती. खासदार नवनीत राणा आणि भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचा आरोप केला आहे.

राणांचे पोलिसांवर आरोप

खासदार नवनीत राणा यांनी याप्रकरणी आरोप केला आहे की, अमरावतीमध्ये लव्ह जिहादचे प्रकार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी थोडा कडक व्यवहार करावा, असे मी अधिकाऱ्यांना सांगण्यासाठी फोन केला. मात्र, त्यांनी आपला फोन रेकॉर्ड केला. पोलिस सहकार्य करत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

तरुणी साताऱ्यात सापडली

अमरावतीमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणातील मुलगी अखेर साताऱ्यात रेल्वेने एकटीने प्रवास करताना सापडली आहे. तिला आजच अमरावतीला आणले जाणार आहे. खासदार नवनीत राणा यांनी काल या प्रकरणी अमरावती पोलिसांशी हुज्जत घातली होती. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले आहे.

बातम्या आणखी आहेत...