आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांतर्फे आंदोलक स्थानबद्ध‎:नवाथे मल्टिप्लेक्सच्या जागेचा वाद‎ चिघळला; मनपा प्रशासनाचा निषेध‎

अमरावती‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवाथे मल्टिप्लेक्सच्या जागेचा‎ वाद चिघळला असून, नागरिक ‎सुरक्षा कृती समितीच्या नेतृत्वात ‎ बुधवार ४ रोजी सकाळी ११.३०‎ च्या सुमारास नवाथे परिसरात ‎ ‎रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनाची तीव्रता बघता‎ पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केले. यावेळी बजरंगबली मंदिर, शितलामाता देवस्थान पाडण्याचा‎ घाट घातला जात असल्याचा‎ आरोप कृती समितीने केला.

तसेच‎ मनपा प्रशासनाविरोधात तीव्र‎ नारेबाजी करण्यात आली.‎ मनपाचे सर्वांत मोठे‎ मल्टिप्लेक्स बनवण्यात येत आहे.‎ त्यासाठी निविदाही काढण्यात‎ आली आहे. मात्र, या‎ मल्टीप्लेक्सचा सर्वसामान्यांना‎ काहीच फायदा होणार नसल्याचे‎ नागरिक सुरक्षा कृती समितीचे मत‎ आहे. त्यामुळे या मल्टिप्लेक्सच्या‎ जागी जीवनावश्यक वस्तूंचे‎ व्यापारी संकुल बनवण्यात यावे.‎ त्यामध्ये भाजीबाजार,‎ धान्यबाजार, शालेय शिक्षण‎ साहित्य, पूजा सामुग्री, कापड‎ मार्केट, चौपाटी अशी‎ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने‎ असावी.

सर्वसामान्यांना परवडेल‎ अशी बाजारपेठ निर्माण करावी.‎ यामध्ये ५० स्क्वेअर फूट पासून ते‎ २०० स्क्वेअर फुटापर्यंतचे गाळे‎ असावे. या भागातील बेरोजगार,‎ महिला बचत गट आणि‎ दिव्यांगांनी ८० टक्के प्राधान्य‎ देण्यात यावे, नवाथे चौकातील‎ ऐतिहासिक बजरंगबली मंदिर‎ आणि शितलामाता मंदिर‎ तोडण्यात येऊ नये, या मागण्यांना‎ घेऊन नागरिक सुरक्षा कृती‎ समितीच्या नेतृवात नवाथे चौकात‎ रस्ता रोको आंदोलन करण्यात‎ आले. यावेळी प्रशासना विरोधात‎ तीव्र नारेबाजी करण्यात आली.‎ यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी‎ आंदोलकांना पोलिस वाहनांमध्ये‎ बसवून स्थानबद्ध केले.

काही‎ काळाने आंदोलकांना सोडण्यात‎ आले.‎ आंदोलनात ज्ञानेश्वर धाने‎ पाटील, मुन्ना राठोड, समीर‎ जवंजाळ, प्रवीण डांगे, गजेंद्र‎ तिडके, रामा सोळंके, राहुल‎ माटोडे, सुनील राऊत, श्रीकृष्ण‎ हिंगणकर, संजय गव्हाळे, संभाजी‎ पेठे, बंटी रामटेके, मनीष देशमुख,‎ प्रवीण आष्टुनकर, मनोज पाठक,‎ सुमित देशमुख, अनिल काळे,‎ सुनील ढाकुलकर, हृदय लाल‎ यादव, महेंद्र गुल्हाने, संजय‎ मळणकर, सुनील मेटकर, रोशन‎ देशमुख, विनोद आष्टुनकर, जितू‎ शर्मा, अरविंद खांडे, सूरज‎ देशमुख सहभागी झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...