आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोल्यातील ११ महाराष्ट्र बटालियनच्या एनसीसी कॅडेट्सनी शुक्रवार, ३ जानेवारी रोजी फेट्रा येथे ‘पुनीत सागर’ अभियान राबवले. या अभियानात विद्यार्थ्यांनी काटेपूर्णा नदीच्या परिसरात वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्वच्छता अभियान राबवत साचलेला प्लास्टिकचा कचरा गोळा केला. या अभियानात ११ महा. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विजय चौधरी, लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला, श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देवेंद्र गावंडे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या एनसीसी सब युनिटच्या ट्रूपचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘पुनीत सागर’ अभियान राबवण्यासाठी सर्व कॅडेट्स महाविद्यालयातून सकाळी दहा वाजता ग्राम फेट्रा येथील काटेपूर्णा नदीच्या परिसरात पोहोचले. दरम्यान, नदीलगत व परिसरात साचलेला प्लास्टिकचा कचरा विद्यार्थ्यांनी गोळा केला.
जमा झालेला हा कचरा पुनर्वापरासाठी अकोला येथील प्लास्टिक रिसायकलिंग केंद्राला पाठवण्यात आला आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेफ्टनंट डॉ. सुनील बोरचाटे, सिनियर अंडर ऑफिसर अजय मस्के, ज्युनियर अंडर ऑफिसर रोहिणी इंगोले, ज्युनियर अंडर ऑफिसर गणेश शिंदे, सार्जंट विकी पवार, एलसीपीएल तृप्ती सिंकटवार, कॅडेट रितेश चव्हाण, प्रशांत वानखडे, पुरुषोत्तम वैद्य, नितेश सनीसे, वंश जामनिक यांच्यासह ४० अन्य कॅडेट्सनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.