आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने‎:चुकीच्या आयात धोरणाविरोधात राष्ट्रवादी‎ काँग्रेसची जळगाव जामोद येथे निदर्शने‎

जळगाव जामोदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या चुकीच्या‎ आयात धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तालुक्याच्या‎ वतीने प्रदेश सरचिटणीस प्रसेनजित पाटील यांच्या‎ नेतृत्वात निदर्शने करून निषेध करण्यात आला. केंद्र‎ सरकारच्या कापूस, तूर आयात धोरणामुळे शेतकरी‎ देशोधडीला लागेल, असा आरोप प्रसेनजित पाटील‎ यांनी केला. केंद्र सरकार व केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष‎ गोयल यांच्याविरोधात नारेबाजी करीत निदर्शने‎ करण्यात आली.

यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रसेनजित‎ पाटील, रंगराव देशमुख, संदीप उगले, प्रमोद सपकाळ,‎ करीम खान, महादेव भालतडक, अडरे देशमुख,‎ साबीर, वर्षा वाघ, वेरूलकर, मनोहर वाघ, राजूसेठ‎ पुनेवाला, वामन गुडेकर, दादाराव धंदर, प्रकाश गावंडे,‎ विठ्ठल वाघ, प्रशांत दाभाडे, दादाराव आटोले, गजानन‎ रोठे, सविता देशमुख, अनिता मिश्रा, सुलोचना‎ पान्हेरकर, गुणवंत वाघ, सुरेश पाचपोर, श्रीकृष्ण‎ जाधव, अतुल वाघ, योगेश कुवर, गजानन मानकर,‎ नितीन उगले उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...