आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश मंडळ:समाजसेवेचा वसा घेतलेले नीळकंठ गणेश मंडळ

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यपूर्व काळापासून समाजसेवेचा वसा घेतलेले नीळकंठ मंडळ यंदा स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत आहे यानिमित्त जयपूरच्या सिटी पॅलेसच्या चंद्र महालाचा देखावा साकारला आहे. राजा जयसिंग यांनी बांधलेला चंद्रमहाल जयपूर सिटी पॅलेसच्या पश्चिम भागात आहे. सध्या हे जयपूरच्या महाराजांचे निवासस्थान आहे. या सात मजली महालातून जयपूर शहराचे विहंगम दृश्य नजरेस पडते.

स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारी नाटकं नीळकंठ व्यायाम मंडळाच्या गणेशोत्सवात सादर व्हायची. नीळकंठ असे नामकरण १९४३ मध्ये गणेशोत्सवाचे करण्यापूर्वी १९२० ते २२ या कालावधीत लोकमान्य टिळकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत दादासाहेब देशपांडे, डी. कमलाकर, नारायणराव गंगात्रे, नारायणराव केवले, माधवराव केवले, रामभाऊ कोनलाडे, बाळकृष्ण पंत दलाल, मातीराव बिजवे, अण्णासाहेब केमदेव, बापूसाहेब काळे, बापूसाहेब गावफळे,

केवले यांच्या वाड्यात व्हायचे सार्वजनिक उत्सव
स्वातंत्र्यपूर्व काळात १९२२ मध्ये जय हिंद क्लबच्या गणरायांची स्थापना नारायणराव केवले यांच्या वाड्यात केली जायची. त्याकाळी बंदी असल्याने सार्वजनिक उत्सव उघडपणे साजरे करता येत नव्हते. पेंटर नारायण गंगात्रे मूर्ती बनवत असत. १९४३ मध्ये बुधवारा येथील नीळकंठेश्वर मंदिरात श्री गणेशाची स्थापना केली. तेव्हापासून मंडळाचे नाव नीळकंठ व्यायाम मंडळ झाले. मूर्तीची उंची कितीही असली तरी तिचे रूप व स्वरूप एकसारखेच असते. मूर्तिकार सोनसळे आजवर ही मूर्ती तयार करीत आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...