आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘नेपच्यून’ 16 रोजी येणार पृथ्वीजवळ ; ग्रहांचे अंतर पृथ्वीपासून होत असते कमी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नेपच्युन ग्रह येत्या १६ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येणार आहे. याला खगोलीय भाषेत प्रति युती असे म्हणतात. एवढेच नव्हे तर हा ग्रह सूर्या च्याही जवळ येणार आहे. प्रतियुतीदरम्यान ग्रहांचे अंतर पृथ्वीपासून नेहमीच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे खगोल शास्त्रज्ञांना या ग्रहांचे निरीक्षक योग्यप्रकारे करता येते. नेपच्युन ग्रह हा १६ रोजी पृथ्वीच्या जवळ येणार असल्यामुळे शहरातील खगोलप्रेमी व शास्त्रज्ञांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.या कालावधीत विद्यार्थ्यांनाही या ग्रहाचे दर्शन घडवण्याचा काही खगोलप्रेमींचा मानस आहे.

सूर्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी नेपच्यून ग्रहाला १६५ वर्षे लागतात. तसेच हा ग्रह १६ तासात स्वत:भोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो. या ग्रहाचा शोध १३ सप्टेंबर १८४६ रोजी जर्मन खगोलशास्त्रही गॅले आणि लव्हेरिया नामक वैज्ञानिकांनी लावला होता. नेपच्यून या ग्रहाला १३ चंद्र असून येथील वातावरणात मिथेन वायू असल्यामुळे तो निळा दिसतो. या ग्रहाचा व्यास ४८,६०० कि.मी.आहे. वर्षभरात कोणता ना कोणता ग्रह हा पृथ्वीच्या जवळ येत असतो. परंतु, काही ग्रह हे बऱ्याच कालावधीनंतर पृथ्वीच्या जवळ येतात. त्यामुळे अशा घटनांना दुर्मिळ घटना समजले जाते. कधी युती-प्रतियुतीही होत असते. या घटना खगोल प्रेमींसह विद्यार्थ्यांना ज्ञानवर्धनासाठी उपयोगी ठरतात.

रात्रभर आकाशात पर्वणी ढगाळ वातावरण निवळले तर १६ सप्टेंबर रोजी रात्रभर फिक्कट निळ्या रंगाच्या नेपच्यून ग्रहाला दुर्बिणीच्या माध्यमातून बघता येईल. हा ग्रह आकाशात ठिपक्याप्रमाणे लहान दिसत असल्यामुळे तो उघड्या डोळ्यांनी बघता येणार नाही. मात्र नेहमीच्या तुलनेत पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे दर्जेदार दुर्बिणीतून त्याची निरीक्षण करता येईल, अशी माहिती मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल शास्त्रज्ञ विजय गिरुळकर यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...